Health Insurance: मोदी सरकार आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करण्याच्या तयारीत; ग्राहकांना होणार थेट फायदा

GST On Health Insurance: तुम्ही जर आरोग्य विमा पॉलिसी घेतली असेल किंवा येत्या काही दिवसांत ती खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार 30,000 रुपयांपर्यंतच्या आरोग्य विम्याच्या प्रीमियमवरील जीएसटी कमी करण्याचा विचार करत आहे.
Central Government may push for 12 percent GST for health insurance; lower rate seen to widen cover
Central Government may push for 12 percent GST for health insurance; lower rate seen to widen cover Sakal

GST On Health Insurance: तुम्ही जर आरोग्य विमा पॉलिसी घेतली असेल किंवा येत्या काही दिवसांत ती खरेदी करणार असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकार 30,000 रुपयांपर्यंतच्या आरोग्य विम्याच्या प्रीमियमवरील जीएसटी कमी करण्याचा विचार करत आहे. सरकार सध्याच्या 18 टक्के जीएसटी दरावरून 12 टक्के करण्याचा विचार करत आहे.

फायनान्शियल एक्स्प्रेसच्या बातमीनुसार, आरोग्य विमा अधिक परवडणारा आणि आकर्षक बनवणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. सध्या 30 हजार रुपयांपर्यंतच्या आरोग्य विमा पॉलिसीमध्ये कुटुंबातील चार सदस्यांना 10 लाख रुपयांपर्यंतचे संरक्षण मिळू शकते.

Central Government may push for 12 percent GST for health insurance; lower rate seen to widen cover
Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

बातमीनुसार, एका अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की जीएसटीमध्ये कपात करण्याच्या निर्णयामुळे प्रीमियम दर कमी करण्यास मदत होईल किंवा हेल्थ कव्हर पर्यायामध्ये अतिरिक्त फायदे मिळतील. ते लोकांच्या गरजेवर अवलंबून असेल.

अधिकाऱ्याचे म्हणणे आहे की हा एक प्रलंबित प्रस्ताव आहे ज्यावर लोकसभा निवडणूक 2024 पूर्ण झाल्यानंतर निर्णय घेतला जाऊ शकतो. या वर्षी फेब्रुवारीमध्ये अर्थविषयक संसदीय स्थायी समितीने विम्यावरील 18 टक्के जीएसटीचा विचार करण्याची गरज असल्याचे सांगितले होते. विशेषत: आरोग्य आणि मुदतीच्या विम्यावर.

जीएसटीपूर्वी सेवा कर 15 टक्के होता

आरोग्य विमा परवडणारा बनवण्यासाठी, विशेषत: ज्येष्ठ नागरिकांसाठी किरकोळ विमा पॉलिसी आणि मुदतीच्या पॉलिसींवरील जीएसटी कमी करण्याबाबत विचार केला जाऊ शकतो, असे समितीने म्हटले होते.

Central Government may push for 12 percent GST for health insurance; lower rate seen to widen cover
Warren Buffett: गुंतवणुकीसाठी अमेरिका ही पहिली पसंती; भारताबद्दल काय म्हणाले वॉरन बफे?

देशात जीएसटी लागू होत असताना, कोणत्याही व्यक्तीने आरोग्य विमा पॉलिसी घेतल्यास त्याला 18 टक्के जीएसटी भरावा लागेल, असा निर्णय घेण्यात आला होता. जीएसटीच्या आधीच्या काळातील 15 टक्के सेवा कराच्या तुलनेत हा दर तीन टक्के अधिक होता. आयकराच्या कलम 80D च्या नियमांनुसार, आरोग्य विमा प्रीमियमवर कर कपातीचा लाभ उपलब्ध आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com