देश

कर्नाटकात पुन्हा ‘ऑपरेशन कमळ’?

सकाळवृत्तसेवा

बंगळूर - राज्यातील काँग्रेस आमदारांत बंडखोरीच्या हालचाली पुन्हा सुरू झाल्या आहेत. त्याचा फायदा घेण्यासाठी भाजपने ‘ऑपरेशन कमळ’ योजना राबविण्याची तयारी सुरू केली आहे. मंत्रिमंडळ पुनर्रचनेत मंत्रिपद गमावण्याची भीती असल्याने बेळगाव जिल्ह्यातील मंत्री रमेश जारकीहोळी आपल्या दहापेक्षा अधिक समर्थक आमदारांसह भाजपच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. त्यासाठी ते अजमेरला गेल्याचे समजते.

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच करण्यात येणार असून, त्यात माजी मंत्री सतीश जारकीहोळींना मंत्रिपद देण्याचा आग्रह माजी मुख्यमंत्री व काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते सिद्धरामय्या यांनी धरला आहे. सतीश यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्यास आपल्याला मंत्रिपद गमवावे लागेल, अशी भीती रमेश यांना आहे. त्यामुळेच त्यांनी बंडखोरीच्या हालचाली सुरू केल्या आहेत. 

सिद्धरामय्याविरोधी गटाच्या नेत्यांच्या सूचनेवरुन ते १० पेक्षा अधिक आमदारांना घेऊन अजमेरला गेले आहेत. खाणसम्राट जनार्दन रेड्डी गटाचे प्रमुख नेते बी. श्रीरामलू यांच्या ते संपर्कात असल्याचे समजते. सतीश यांना मंत्रिमंडळात घेऊन आपली उचलबांगडी केल्यास समर्थक आमदारांसह राजीनामा देणार असल्याचे सांगून ते काँग्रेस नेत्यांवर दबाव आणत असल्याची चर्चा आहे.

दुसरीकडे संधी मिळाल्यास सरकार स्थापन करण्यास बी. एस. येडियुरप्पा आतुर झाले आहेत. भाजपला आवश्‍यक आमदारांचा पाठिंबा मिळवून दिल्यास उपमुख्यमंत्रिपद देण्याचे आश्वासन त्यांनी श्रीरामलू यांना दिल्याचे समजते. त्यामुळे श्रीरामलू क्रियाशील बनले आहेत. काँग्रेसमधील असंतुष्ट आमदारांच्या ते सतत संपर्कात आहेत. पुन्हा एकदा ‘ऑपरेशन कमळ’ राबवून काँग्रेसमधील असंतुष्ट आमदारांना भाजपत समाविष्ट करून घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushma Andhare: सुषमा अंधारेंना घ्यायला आलेलं हेलिकॉप्टर क्रॅश, कारण अस्पष्ट

Amitabh Bachchan: बिग बींचं एक ट्वीट अन् नव्या वादाला सुरुवात; भाजप-आदित्य ठाकरेंमध्ये ट्विटर वॉर, नेमकं प्रकरण काय?

Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

Trucks Carrying Cash: चार ट्रक, हजारो कोटींच्या मळलेल्या नोटा अन् पोलीस; वाचा चित्रपटालाही लाजवेल असे थरारनाट्य

Latest Marathi News Live Update : सांगलीत भाजपचे दोन उमेदवार आमच्यासमोर- संजय राऊत

SCROLL FOR NEXT