Vivek Agnihotri Google
देश

विवेक अग्निहोत्रींचे ऑक्सफोर्ड युनिवर्सिटी वर गंभीर आरोप, शेअर केला VIDEO

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : ऑक्सफर्ड विद्यापीठाने प्रसिद्ध चित्रपट निर्माते विवेक रंजन अग्निहोत्री यांना व्याख्यान देण्यावर बंदी घातली आहे. दरम्यान त्यांनी आपल्या ट्वीटर अकाऊंटवर आपला अनुभव शेअर करताना सांगितले की, 'हिंदू' हा शब्द रेग्युलेट करण्यात आला आहे. ते म्हणाले की, 'हिंदूफोबियाने ग्रस्त असलेल्या ऑक्सफर्ड युनियनमध्ये हिंदू आवाजावर पुन्हा बंदी घालण्यात आली आहे.

चित्रपट दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी स्वतः ट्विट करून ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात त्यांना बोलण्यास मनाई करण्यात आल्याची माहिती दिली. अग्निहोत्री म्हणाले, “त्यांनी माझा कार्यक्रम रद्द केला. पण प्रत्यक्षात त्यांनी हिंदू नरसंहार आणि ऑक्सफर्ड विद्यापीठात अल्पसंख्याक असलेल्या हिंदू विद्यार्थ्यांचा आवाज बंद केला आहे. ते पुढे म्हणाले, “ऑक्सफर्ड विद्यापीठाने ज्याची अध्यक्षपदी निवड केली आहे ते पाकिस्तानी आहेत. कृपया माझी सर्वात कठीण लढाई सर्वांसोबत शेअर करा आणि मला पाठिंबा द्या."

तत्पूर्वी, दुसर्‍या ट्विटमध्ये अग्निहोत्री म्हणाले की, त्यांनी केंब्रिज विद्यापीठालाही भेट दिली होती आणि शेवटच्या क्षणी या कार्यक्रमाच्या व्हिडिओ रेकॉर्डिंगला परवानगी दिली जाणार नाही, असे सांगण्यात आले होते. केंब्रिज विद्यापीठाचा संदर्भ देत ते म्हणाले की, येथील एका महाविद्यालयात त्यांचा कार्यक्रम रद्द करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

अग्निहोत्री यांनी ट्विट केले की, "काल रात्री केंब्रिज विद्यापीठाच्या फिट्झविलियम कॉलेजमध्ये फॅसिस्ट आणि नरसंहार नकारणाऱ्यांनी माझा कार्यक्रम रद्द करण्याचा प्रयत्न केला. विरोध केल्यावर त्यांनी व्हिडिओ रेकॉर्डिंगची न करण्याची ठेवत कार्यक्रम होऊ दिला. ही क्लिप संमतीशिवाय कोणीतरी रेकॉर्ड केली आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs SRH Live : सनरायझर्स हैदराबादचा इडन गार्डनवर दरारा! कोलकाता नाइट रायडर्सचा सलग दुसरा पराभव; गुणतालिकेत फेरबदल

Bharat Solanke : ‘स्टेअरिंग’ सोडलं अन् हातात घेतली लेखणी; ट्रकचालक भारत सोळंके यांचा ‘पीएचडी’पर्यंतचा थक्क प्रवास

IAS transfer: राज्यातील २५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; रात्री उशिरा काढले आदेश

हनुमान जन्मोत्सवानिमित्त वानरांची शिस्तीत पंगत; वानरांना एका रांगेत बसवून केले अन्नदान

Pune CNG Price Hike: मोठी बातमी! पुण्यात 'सीएनजी'चे दर वाढले; मध्यरात्रीपासून नवा भाव लागू होणार

SCROLL FOR NEXT