देश

Loksabha 2019: 1996च्या फॉर्म्युल्याने देशाला मिळणार नवा पंतप्रधान?

वृत्तसंस्था

हैद्राबाद: 1996च्या फॉर्म्युल्यानुसार देशाला नवा पंतप्रधान देण्याचे प्रयत्न तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्याकडून करण्यात येत आहेत. केसीआर मागील काही दिवसांपासून तिसऱ्या आघाडीची जोरदार बांधणी करत असल्याचे दिसून येत आहे. 

केसीआर यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री एच.डी कुमारस्वामी यांच्यासारख्या काही मोठ्या नेत्यांसोबत संपर्कात आहेत. केसीआर यांनी काल (ता.06) सोमवारी कुमारस्वामी यांची भेट घेत या विषयावर चर्चा केली असल्याचे सांगण्यात येत आहे. 

भाजप आणि काँग्रेसला सत्तेपासून बाहेर ठेवण्यासाठी प्रादेशिक पक्षांना एकत्र करत देशाला नवा पंतप्रधान देण्यासाठी केसीआर यांच्याकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत असून, यासाठी 1996च्या फॉर्मुल्याचा आधार घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचीही केसीआर यांनी भेट घेऊन या विषयावर चर्चा केली आहे. सोबतच, 13 मे रोजी केसीआर द्रमुक अध्यक्ष स्टॅलिन यांची भेट घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या निकालाची तारीख जवळ येत असताना केसीआर यांनी प्रमुख नेत्यांच्या भेटीवर लक्ष केंद्रित केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

GST Collection: जीएसटीने रचला इतिहास! पहिल्यांदाच कलेक्शन 2 लाख कोटींच्या पुढे; सरकार मालामाल

Rinku Singh : संघ निवडीबाबत मोठा खुलासा! BCCI च्या 'या' नियमामुळे रिंकूचे वर्ल्ड कप खेळण्याचे मिळाले स्वप्न धुळीस?

Latest Marathi News Live Update: विदर्भ राज्य पार्टीच्या वतीने आज महाराष्ट्र दिवस हा काळा दिवस म्हणून पाळला जात आहे

Bahubali: Crown Of Blood : "बाहुबली परत येतोय" ; एसएस राजामौली यांनी केली नव्या सिरीजची घोषणा

T20 World Cup 2024 All Teams Squad : भारत, पाकिस्तान, इंग्लंडसह सर्व 20 संघांचा 'स्क्वाड'! जाणून घ्या फक्त एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT