Bahubali: Crown Of Blood : "बाहुबली परत येतोय" ; एसएस राजामौली यांनी केली नव्या सिरीजची घोषणा

SS Rajamouli announces new series based on Bahubali: दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी बाहुबली सिनेमावर आधारित सिरीजची घोषणा केली. या सिरीजचा टीझरही सोशल मीडियावर रिलीज करण्यात आला.
Ss rajamouli's new series based on Baahubali
Ss rajamouli's new series based on Baahubali

SS Rajamauli new based on Baahubali : एसएस राजामौली यांच्या बाहुबली या सिनेमाला प्रचंड यश मिळालं. अजूनही हा सिनेमा प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. सत्तेच्या लढाईची गोष्ट असणारा हा सिनेमा कट साऊथ इंडस्ट्रीमध्येच नाही तर संपूर्ण भारतात गाजला आणि या सिनेमाविषयी राजामौली यांनी महत्त्वाची घोषणा केली. लवकरच बाहुबली सिनेमावर आधारित एक अॅनिमेटेड सिरीज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ शेअर करत या अॅनिमेटेड सिरीजची घोषणा केली.

Ss rajamouli's new series based on Baahubali
Pathan Beats Bahubali 2: पठाण ठरला 'बाहुबली'! राजामौलींच्या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला!

आगीच्या धुरातून प्रकट होणारं बाहुबलीचं शीर्षक या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं. 'बाहुबली: द क्राऊन ऑफ ब्लड' असं सिरीजचं नाव असून या सिरीजचा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. बाहुबली सिनेमाच्या दोन्ही पार्टवर ही सिरीज आधारित आहे. "जेव्हा महिष्मती राज्यातील लोक त्याच्या नावाचा जप करतात तेव्हा जगातील कोणतीही ताकद त्याला रोखू शकत नाही. बाहुबली: क्राऊन ऑफ ब्लड ही अॅनिमेटेड वेबसिरीज लवकरच तुमच्या भेटीस येत आहे." असं कॅप्शन त्यांनी या व्हिडिओला दिलं आहे.

आता या वेबसिरीजमधील पात्रांना कोणते कलाकार आवाज देणार कि जुनीच टीम या अॅनिमेटेड सिरीजचं डबिंग करणार याविषयी राजामौली यांनी कोणत्याही प्रकारचं भाष्य केलं नाहीये. या आधीही बाहुबलीवर आधारित अॅनिमेटेड सिरीज प्रेक्षकांच्या भेटीस आली असून तिचं नाव 'बाहुबली: द लॉस्ट लिजेंड्स' या नावाने ही सिरीज अॅमेझॉन प्राईमवर उपलब्ध आहे.

पहा टीझर:

बाहुबलीची क्रेझ आणि मिळालेलं जागतिक यश

२०१५ साली बाहुबलीचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला तर दुसरा भाग २०१७ साली प्रेक्षकांच्या भेटीस आला. या सिनेमाला जागतिक यश मिळालं. जपान, चीन आणि युरोपातील महत्त्वाच्या देशांमध्ये हा सिनेमा रिलीज झाला होता. बाहुबली २ या सिनेमाने तब्बल १८१० करोड रुपयांची कमाई केली होती. प्रभास, राणा दगुबत्ती, अनुष्का शेट्टी, सत्यराज, राम्या कृष्णन आणि नसर यांची या सिनेमात मुख्य भूमिका होती.

राजामौली सध्या नवीन प्रोजेक्टच्या कामात व्यस्त असून सुपरस्टार महेश बाबूसोबत त्यांचा नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या सिनेमाचं तात्पुरतं नाव 'SSMB29' असं ठेवण्यात आलं आहे.

Ss rajamouli's new series based on Baahubali
Sarabhai Fame Actress Join BJP: 'साराभाई 'फेम अभिनेत्रीने हाती घेतला कमळ! विनोद तावडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com