kerala women alleges rape by student activist inside cpms local office
kerala women alleges rape by student activist inside cpms local office 
देश

माकपच्या कार्यालयात बलात्कार झाल्याचा आरोप

वृत्तसंस्था

पलक्कड (केरळ) : येथील चेरुप्लासरी गावातील मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयामध्ये आपल्यावर बलात्कार झाल्याची तक्रार एका महिलेने पोलिस ठाण्यात केली आहे. गेल्या आठवड्यात येथे एक नवजात अर्भक रस्त्याच्या कडेला आढळून आले होते. पोलिसांनी बाळाच्या आईचा शोध घेतला असता ते एका 21 वर्षांच्या महिलेपर्यंत पोचले. आपल्यावर दहा महिन्यांपूर्वी माकपच्या कार्यालयात बलात्कार झाला होता, असा तिने आरोप केला. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने चौकशी सुरू केली आहे.

पोलिसांना शनिवारी (ता. 16) रस्त्यावर एक नवजात अर्भक सापडले होते. पोलिसांनी या मुलीच्या आईला शोधून काढले. त्यावेळी दहा महिन्यांपूर्वी सीपीआय(एम)च्या कार्यालयात विद्यार्थी कार्यकर्त्याने केलेल्या बलात्कारातून आपण गर्भवती राहिल्याचा आरोप महिलेने केला. कॉलेजच्या मॅगझिनची तयारी करण्यासाठी आपण पक्षाच्या कार्यालयात गेलो होतो. त्यावेळी ही घटना घडली आहे, असा दावा महिलेने केला आहे.

पीडित महिला एसएफआयची कार्यकर्ता असून, तिचे कुटुंबही पक्षामध्ये सक्रिय आहे असे स्थानिक सीपीआय(एम) नेत्याने सांगितले. पक्ष कार्यालयात अशी घटना घडली असेल तर त्याची चौकशी करु. पोलिसांनीही सत्य शोधून काढावे असे या सीपीआय(एम) नेत्याने म्हटले आहे. सीपीआय(एम) चे पक्ष कार्यालय बलात्काराचे केंद्र बनले आहे. मला हे खेदाने म्हणावे लागतेय पण हे सत्य आहे, अशी टीका काँग्रेस नेते रमेश चीन्नीथाला यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT