Abdul Rahim Kerala Crowd Funding Esakal
देश

Blood Money: केरळमध्ये 40 दिवसांत कशासाठी जमा केले 34 कोटी? सौदी अरेबियातील 'त्या' घटनेने लाकांना आणले एकत्र

Kerala Crowd Funding: मुलाची काळजी घेणे आणि त्याचा चालक म्हणून काम करणे, अशी रहीमची जबाबदारी होती. पण एकदा रहीमकडून चुकून त्या मुलाच्या गळ्यात जोडलेले वैद्यकीय यंत्र खाली पडले.

आशुतोष मसगौंडे

Abdul Rahim Saudi Jail Case:

केरळवासीयांनी धार्मिक आणि राजकीय मतभेद बाजूला ठेवत सौदी अरेबियामध्ये मृत्यूदंडाची शिक्षाल झालेल्या एका व्यक्तीला मुक्त करण्यासाठी आवश्यक असलेले 34 कोटी रुपये अवघ्या 40 दिवसांत उभे केले. या घटनेमुळे केरळमधील सामाजिक वातावरण किती समृद्ध आहे याची झलक पाहायला मिळाली आहे.

2006 पासून सौदी अरेबियातील तुरुंगात असलेल्या रहीमला हत्येचा आरोप सिद्ध झाल्यानंतर 2018 मध्ये फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.

मात्र, गेल्या ऑक्टोबरमध्ये सौदी अरेबियाच्या न्यायालयाने पीडितेच्या कुटुंबीयांना ब्लड मनी म्हणून 34 कोटी रुपये दिल्यास रहीमची सुटका करण्याचे आदेश दिले होते. ब्लड मनी भरण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल होती. मुदत संपायच्या 3 दिवस आधी ही रक्कम भरण्यात आली.

सौदी अरेबियाला जाण्यापूर्वी रहीम कोझिकोड येथे ऑटो चालक म्हणून काम करायचा. रहीमला त्याच्या प्रायोजकाच्या 15 वर्षांच्या पॅराप्लेजिक मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल दोषी ठरविण्यात आले होते.

मुलाची काळजी घेणे आणि त्याचा चालक म्हणून काम करणे, अशी रहीमची जबाबदारी होती. पण एकदा रहीमकडून चुकून त्या मुलाच्या गळ्यात जोडलेले वैद्यकीय यंत्र खाली पडले. यामुळे मुलगा बेशुद्ध पडला आणि मरण पावला.

रहीमने यापूर्वी सुटकेसाठी अनेक वेळा अपील केले होते. 2011, 2017 आणि 2022 मध्ये प्रत्येक वेळी त्याचे अपील फेटाळण्यात आले. मात्र, यावेळी न्यायालयाने त्याचे आपील स्वीकारल्याने त्याच्या सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे.

रहीमच्या सुटकेसाठी केलेल्या क्राउडफंडींगवर प्रतिक्रिया देताना केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन म्हणाले की, केरळ हा बंधुभावाचा बालेकिल्ला आहे, ज्याला कोणत्याही प्रकारचा जातीयवाद तोडू शकणार नाही.

"केरळ हा बंधुभावाचा बालेकिल्ला आहे ज्याला जातीयवादाने तोडता येणार नाही याचीच ही झलक आहे. रहीमच्या सुटकेसाठी सर्वांना एकत्र आणणाऱ्यांचे मी मनापासून कौतुक करतो, त्यांच्यामुळेच आज केरळची मान जगासमोर ताठ झाली आहे. याच एकजुटीसाठी आपण एक चित्ताने, दृढतेने पुढे जाऊया,” असे मुख्यमंत्री म्हणाले.

रहीमसाठी क्राउडफंडिंग करणाऱ्या संस्थेने सांगितले की, रियाधमधील 75 हून अधिक संस्था, केरळचे व्यापारी बॉबी चेम्मनूर, राज्यातील विविध राजकीय संघटना आणि सामान्य लोकांनी आम्हाला निधी उभारण्यात मदत केली. रहीमची आई फातिमा यांनी 34 कोटी रुपये जमा झाल्यावर सर्वांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! ‘या’ महिलांना यापुढे मिळणार नाही लाडकी बहीण योजनेचा लाभ; एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिलांचे लाभ बंद, आता 2.50 लाखाचे उत्पन्न नसलेल्यांची पडताळणी

New Delhi: उच्च न्यायालय! 'पीडित मुलीच्या आरोपांची दखल घ्या'; फक्त वैद्यकीय अहवालावर विसंबून राहू नका

Panchang 21 July 2025: आजच्या दिवशी शिव कवच स्तोत्राचे पठण करावे

Beed Crime: 'त्या' प्रेमप्रकरणाचा जीवघेणा शेवट; पाच आरोपींपैकी तिघांना अटक, दोन फरार,गेवराईतील घटना

14 वर्षे जुन्या ‘एसएमटी’तून दररोज 2000 शालेय मुलींसह 7000 प्रवाशांचा प्रवास! नोव्हेंबरमध्ये सोलापुरातून धावणार केंद्र सरकारच्या नव्या इलेक्ट्रिक बस

SCROLL FOR NEXT