Crowdfunding नी बदलले डिलिव्हरी बॉयचे आयुष्य

क्राउडफंडिंगच्या मदतीने दुर्गा मीनाने बाईक घेतली.
zomato delivery boy bought bike through crowdfunding
zomato delivery boy bought bike through crowdfunding sakal

इंटरनेटचा योग्य वापर केला तर त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो.याचा प्रत्यय आलाय राजस्थानमधील झोमॅटो डिलिव्हरी बॉयला.सध्या सोशल मीडियावर या फूड डिलिव्हरी बॉयची गोष्ट व्हायरल होत आहे. डिलिव्हरी बॉय दुर्गा मीना कडक उन्हात सायकलवरुन फूड डिलिव्हरी करतो. त्याला बाईकची नितांत गरज होती. जेव्हा सोशल मिडियावर हि गोष्ट व्हायरल झाली तेव्हा लोकांनी क्राउडफंडिंगद्वारे दुर्गा मीनाला मदत करण्यास सुरवात केली. या क्राउडफंडिंगद्वारे दुर्गा मीना याने बाईक घेतली आहे. (zomato delivery boy bought bike through crowdfunding)

आदित्य शर्मा नावाच्या तरुणाने दुर्गा मीनाची कहानी जगासमोर आणली होती त्यानेच आता बाईक विकत घेतल्याचा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर केलाय.

zomato delivery boy bought bike through crowdfunding
उत्तर प्रदेश : नदीत बोट उलटून दहा महिला बुडाल्या; तीन तरुणींचा मृत्यू

आता व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, Zomato डिलिव्हरी बॉय दुर्गा मीना आणि आदित्य बाईक शोरूमच्या सेल्स एक्झिक्युटिव्हशी मायलेजच्या आधारावर कोणती बाईक खरेदी करायची याबद्दल चर्चा करताना दिसत आहे.

zomato delivery boy bought bike through crowdfunding
पृथ्वीवरच्या अवकाशात घोंघावतंय सौर वादळ

आदित्य शर्माने ट्विटरवर या डिलिव्हरी बॉयची खरी कहाणी शेअर केली होती. डिलिव्हरी बॉय दुर्गा मीना व्यवसायाने शिक्षक असून गेल्या 12 वर्षांपासून तो शिक्षकी पेशात आहे मात्र कोरोना काळात त्याची नोकरी गेली. दुर्गा हा आदित्य याच्याशी इंग्रजीत बोलत असल्याचेही आदित्यने सांगितले होते.

दुर्गाने बीकॉमचे शिक्षण घेतले आहे आणि त्याला पुढे मास्टर्स पूर्ण करायचे आहे पण आर्थिक परिस्थितीमुळे तो हे करू शकत नव्हता आणि म्हणूनच तो सध्या Zomato मध्ये काम करतोय.

zomato delivery boy bought bike through crowdfunding
देशातील पहिली बुलेट ट्रेन 2027 मध्ये धावणार...

आदित्यने सांगितले होते की दुर्गा दर महिन्याला काही पैसेही वाचवतो जेणेकरून त्याला बाईक खरेदी करता येईल. दुर्गा एका दिवसात सायकलनी 10-12 ऑर्डरची डिलिव्हरी करतो. जर बाईक उपलब्ध असेल तर डिलिव्हरी करणे आणखी सोपे होईल. हे लक्षात घेऊन आदित्यने क्राउडफंडिंग सुरू केले होते. त्याने दुर्गा शंकर मीनाचा UPI आयडी शेअर केला, जेणेकरून पैसे थेट दुर्गा मीनाच्या खात्यात ट्रान्सफर होतील आणि त्याप्रमाणे क्राउडफंडिंगद्वारे दुर्गा मीनाला मदत करण्यास सुरवात केली. या क्राउडफंडिंगच्या मदतीने दुर्गा मीना याने बाईक घेतली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com