देश

India-Canada Tension:भारतीय हिंदुंनो कॅनडा सोडून निघून जा; कॅनडातील SFJ च्या फुटीरतावाद्याने काढले फर्मान

India-Canada Tension:'भारतीय हिंदूनो लवकर कॅनडासोडून निघून जा', कॅनडातील खलिस्तानी फुटीरावाद्याने सुनावला फर्मान

Manoj Bhalerao

India- Canada Tension:सध्या भारत आणि कॅनडा या देशांतील वाद पराकोटीला गेला आहे. हरदीप सिंह निज्जर या खलिस्तानी दहशतवाद्याच्या हत्येचा कट भारताने रचला होता, असा आरोप कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी लावला होता. त्यानंतर या दोन्ही देशांमधील संबंधात कटूता निर्माण झाली. दोन्ही देशांकडून एकमेकांच्या राजदूतांची अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली.

त्यानंतर कॅनडामध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी मार्गदर्शक सूचना देखील जारी करण्यात आल्या होत्या. मात्र, आता कॅनडामधील 'सिख फॉर जस्टिस' या संघटनेचा म्होरक्या गुरपतवंत सिंह पन्नू याने भारतीयांना धमकी देत कॅनडा सोडण्याचा फर्मान सुनावलाय.

भारतीयांना धमकी देतानाचा त्यांचा व्हिडीओ समोर आला आहे. खलिस्तान समर्थक संघटना 'सिख फॉर जस्टिस (SFJ)' ने कॅनडामध्ये राहणाऱ्या हिंदूंना धमकी दिली आहे आणि त्यांना लवकरात लवकर देश सोडण्यास सांगितले आहे. पन्नूचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यामध्ये तो कॅनेडियन भारतीयांना लवकरात लवकर कॅनडा सोडून भारतात जाण्यास सांगत आहे. व्हिडीओमध्ये दहशतवादी पन्नू "भारत-हिंदू कॅनडा सोडा; भारतात जा. तुम्ही केवळ भारताचे समर्थन करत नाही, तर खलिस्तान समर्थक शिखांचे भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपण्याचं समर्थन करताय" असे म्हणताना ऐकू येत आहे.

या व्हिडीओमध्ये पन्नू म्हणाला की, शहिद निज्जर यांच्या हत्येचा आनंद साजरा करून तुम्ही हिंसेचे समर्थन करताय. 29 ऑक्टोबर रोजी व्हँकुव्हर येथे झालेल्या तथाकथित सार्वमतामध्ये मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी कॅनेडियन शिखांना केले.(Latest Marathi News)

https://x.com/sukh_randhawa14/status/1704104550632767781?s=20

पन्नूने यांनी कॅनडातील खलिस्तान समर्थक शिखांचेही कौतुक केले आणि ते म्हणाले की ते नेहमीच एकनिष्ठ राहिले आहेत आणि त्यांनी देशाचे कायदे आणि संविधानाचे समर्थन केले आहे. वास्तविक भारताने SFJ प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू यांना दहशतवादी घोषित केले आहे.

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांच्या विधानानंतर काही तासांनी हा व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यात त्यांनी खलिस्तानी नेता हरदीप सिंहच्या हत्येमध्ये नवी दिल्लीच्या एजंट्सचा सहभाग असल्याच्या विश्वसनीय आरोप लावला आणि कॅनडाच्या गुप्तचर संस्था याबाबत सक्रिय असल्याचे म्हटले होते. भारताने ट्रुडोचा दावा ताबडतोब फेटाळला आणि कॅनडाने भारताच्या वरिष्ठ अधिकाऱ्याची हकालपट्टी केल्यावर कॅनडाच्या अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली.(Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Cash Withdrawal: आता कॅशसाठी एटीएममध्ये जाण्याची गरज पडणार नाही, स्कॅन करताच रोख रक्कम हातात येईल, पण कसं?

IND vs PAK, Asia Cup: भारतानं हस्तांदोलन टाळलं, पण पाकिस्तानची कारवाई आपल्याच अधिकाऱ्यावर; पदावरूनच केलं बडतर्फ

Latest Marathi News Updates : वंजारा-बंजारा एक आहे, या धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक

Saurabh Bharadwaj Challenge SuryaKumar Yadav : ‘आप’चे नेते सौरभ भारद्वाज यांचं सूर्यकुमार यादवला चॅलेंज अन् टोमणेही मारले!

Bathing Tips for Good Health: स्वच्छतेसोबत आरोग्यही जपा – आंघोळ करताना फॉलो करा या महत्त्वाच्या टिप्स!

SCROLL FOR NEXT