देश

बेळगाव जिल्ह्यातील खानापूर बनतेय वन्यजीवांचे आगर

सुनील गावडे

बेळगाव - भीमगड अभयारण्याची निर्मिती आणि वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कडक अंमलबजावणीमुळे सहा-सात वर्षांत खानापूर तालुक्‍यात वन्यजीवांची संख्या लक्षणीयरित्या वाढली आहे. त्यात गवे व चितळांनी आघाडी घेतली आहे. एकेकाळी दुर्मीळ असलेला वाघ आता या जंगलांची नवी ओळख बनला आहे. तृणभक्षी वाढल्याने मांसभक्षी प्राण्यांतही आपसूकच वाढ झाली आहे. त्यामुळे, अधूनमधून मानव-वन्यप्राणी संघर्ष निर्माण होत असला तरी तो तीव्र बनलेला नाही.

तालुक्‍यात दोन वन उपविभाग असून सहा परिक्षेत्र आहेत. या सर्व परिक्षेत्रात वैविध्यपूर्ण वन्यजीवन पाहावयास मिळते. हत्ती, गवे, अस्वल, वाघ, बिबटे, रानडुक्‍कर, भेकर, पिसोरी हरीण, कोल्हे, लालतोंडी माकडे सर्वच वनक्षेत्रात आढळतात. पण, काळे बिबटे, सांबर, किंग कोब्रा यांचे अस्तित्त्व भीमगड, खानापूर, कणकुंबी व लोंढा वनक्षेत्रातच आहे. नागरगाळी व लोंढा भागात चितळे मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे, वन्यजीवांच्या बाबतीत तालुका समृद्ध बनला आहे. २०११ मध्ये भीमगड अभयारण्य बनल्यापासून वन्यजीवांना संरक्षक कवच लाभले असून त्यांची संख्या वर्षागणिक वाढतच आहे.

सध्या वाघांची संख्या तर १२ वर पोचली आहे. बिबट्यांची मोजदाद झाली नसली तरी त्यांची संख्या वाढली आहे. मात्र, गवे व चितळांची संख्या सर्वाधिक वाढली आहे. त्याखालोखाल अस्वल, कोल्हे, साप व माकडांच्या संख्येत वाढ आहे. काळा बिबट्या व किंग कोब्रा या दुर्मीळ प्रजातींमध्येही अनपेक्षित वृद्धी झाली आहे. हा सर्व वनसंवर्धन व संरक्षणाचा परिणाम आहे. अँटी पोचिंग कॅम्पमुळे अवैध शिकारीला आळा बसला आहे.

जंगलातच झालेली पाण्याची सोय प्राण्यांच्या पथ्यावर पडली आहे. त्यामुळे त्यांची संख्या वाढत असल्याचे प्रत्येक वनक्षेत्रातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

आम्ही वन्यजीव संरक्षण कायद्याची कडक अंमलबजावणी करत आहोत. वृक्षतोडीला आळा बसला असून अवैध शिकारही कमी झाली आहे. जंगलातील मानवी हस्तक्षेप घटला आहे. वनकर्मचाऱ्यांना आधुनिक उपकरणांनी सुसज्ज करण्यात आले आहे. त्याचा एकत्रित परिणाम वन्यजीवांची संख्या वाढण्यात झाला आहे.
- सी. बी. पाटील, 

सहाय्यक वनसंरक्षक, खानापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Google Layoffs : गुगलमधील कर्मचारी कपात सुरूच.. कोअर टीममधून 200 जणांना नारळ! भारत-मेक्सिकोमध्ये देणार संधी

Shyam Rangeela: मेरे प्यारे देशवासियो... मोदींची मिमिक्री करत प्रसिद्ध झालेल्या कॉमेडियनचे वाराणसीतून पंतप्रधानांना आव्हान

CSK vs PBKS : 'सेल्फिश' धोनी! शेवटच्या ओव्हरमधील ड्राम्यानंतर थाला होतोय ट्रोल, Video Viral

Share Market Today: शेअर बाजार उघडताच 'या' शेअर्सवर ठेवा लक्ष; काय आहे तज्ज्ञांचा अंदाज?

SCROLL FOR NEXT