kiran kumar reddy slam congress after he joins bjp party andhra pradesh former cm joins bjp  
देश

Kiran Kumar Reddy : भाजपमध्ये प्रवेश करताच माजी मुख्यमंत्र्यांचे काँग्रेसला खडे बोल; म्हणाले…

रोहित कणसे

आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते किरण कुमार रेड्डी यांनी आज (७ एप्रिल) काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यानी पक्ष अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पत्र लिहून राजीनामा दिला होता. भाजपध्ये सामील होताच रेड्डी यांनी काँग्रेस सोडण्याचं कारण दितेना पक्षावर कडाडून टीका केली आहे. (Andhra Pradesh Former CM Joins BJP)

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर लगेच भाजप हेडक्वार्टरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, काँग्रेस लोकांपर्यंत पोहचू शकत नाहीये आणि चूकीच्या निर्णयांमुळे पक्षाचे प्रत्येक राज्यातत तुकडे पडत आहेत. हे फक्त एका राज्यात होत नसून सगळ्या राज्यात हीच परिस्थिती असल्याचे रेड्डी म्हणाले.

हेही वाचा - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

माध्यमांशी बोलताना रेड्डी म्हणाले की, मी काँग्रेसबद्दल सांगू इच्छीतो की काँग्रेस पक्ष जनमत समजू शकत नाहीये. काँग्रेस पक्ष चुकांचे विश्लेषन करत नाहीये आणि त्या सुधारण्यासाठी प्रयत्न देखील करत नाहीये.

किरण कुमार रेड्डी यांनी काँग्रेसचे नेते, माजी खासदार राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. रेड्डी यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले की काँग्रेसमधील नेत्यांना वाटतं की मीच बरोबर आहे आणि देशातील जनतेसहित सगळे चुक आहेत. याच विचारधारेमुळे मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला.

तसेच च्यांनी राहुल गांधी यांच्या नावाचा अप्रत्यक्षपणे उल्लेख करुन ते म्हणाले, एक जुनी कथा आहे की माझा राजा बुद्धीमान आहे. तो स्वतः देखील विचार करीत नाही आणि कोणाचाही सल्ला देखील ऐकत नाही. तुम्हाला लक्षात आले असेल की मा काय सांगण्याचा प्रयत्न करतोय.

किरण कुमार रेड्डी यांनी ११ मार्च रोजी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. २०१४ मध्ये तत्कालीन सरकारने आंध्रप्रदेशचे विभाजन करुन तेलगंणा राज्याची निर्मिती करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला रेड्डी यांनी विरोध केला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेसचा राजीनामा देत 'जय समैक्य आंध्र पार्टी' ची स्थापना केली होती. पण २०१८ मध्ये पुन्हा त्यांनी काँग्रेसमध्ये घरवापसी केली.

रेड्डी यांनी १९८९ मध्ये आपल्या राजकीय जीवनाची सुरवात केली होती. ते वायलपाडू येथून काँग्रेसच्या तिकीटावर निवडूण आले होते. रेड्डी हे १९९९ आणि २००४ मध्ये एकाच मतदारसंघातून तर २००९ मध्ये पिलेरु विधानसभा मतदार संघातून आमदार झाले होते. २००९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आयएस राजशेखर रेड्डी यांच्या निधनानंतर त्यांनी २०१०मध्ये अविभाजित आंध्र प्रदेशचे नेतृत्व केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT