Kolhapur and Jamnagar honored with gratitude sheltered to Polish citizens
Kolhapur and Jamnagar honored with gratitude sheltered to Polish citizens sakal
देश

कोल्हापूर, जामनगरचा होणार गौरव

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळात सोव्हिएत रशियाच्या छळछावण्यांतून मुक्त झालेल्या पोलंडच्या हजारो नागरिकांना उदारपणे आश्रय देणाऱ्या कोल्हापूर व जामनगर या संस्थानांचा कृतज्ञता सन्मान देऊन गौरव करण्यात येणार आहे. पोलंड सरकारच्या वतीने उद्या (ता.५) रोजी राजधानी वॉर्सा येथे यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चांगल्या राजांचा गौरव हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या भारत सांस्कृतिक संबंध परिषदेच्या (आयसीसीआर) पुढाकाराने होणारा हा कार्यक्रम पोलंडमधील भारतीय दूतावासाने खास आयोजित केला आहे. कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे आणि संयोगिताराजे छत्रपती तसेच जामनगरच्या महाराजांचे प्रतिनिधी, ‘आयसीसीआर’चे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे उपस्थित राहतील.

महायुद्धाच्या काळात पोलंडचा भारतातील कार्यरत होता. रशियाच्या ह्या श्रमछावण्यांतून वाचलेल्या निर्वासितांना जामनगर संस्थानातल्या बालाछडी व कोल्हापूर संस्थानातल्या वळीवडे गावांत आश्रय देण्यात आला होता. पोलंडचे भारतातील राजदूत डॉ. बानसिनस्बी १९४१ पासून पोलिश निर्वासितांना भारतामध्ये वसविले जावे ह्यासाठी ब्रिटिश सरकारकडे पाठपुरावा करीत होते. ब्रिटनने १९४२ मध्ये त्यांचा प्रस्ताव मंजूर केला व या हजारो पोलिश निर्वासितांची सोय भारतात करण्याचे आदेश ब्रिटिश सरकारने भारतातील व्हाइसरॉयला दिले होते. जामनगरच्या महाराजांनी ५०० निर्वासितांची सोय करायची तयारी दाखविली. उरलेल्या निर्वासितांसाठी कोल्हापूरनजीक वळीवडे गावानजीकची जागा निश्चित करण्यात आली होती.

सोव्हिएत रशियाच्या श्रमछावण्यांतून सुटका झालेले १० हजार पोलिश निर्वासित १९४८ पर्यंत कोल्हापुरात स्थानिक लोकांशी मिळून मिसळून राहिले. वडिवळ्याच्या सुखद आठवणी घेऊन नंतर ते पुन्हा मायदेशी पोलंडला गेले. यातील काही मुलींचे विवाहही कोल्हापूर व आसपासच्या गावांतील मुलांबरोबर झाले. यापैकी आज हयात असलेले हे पोलंडचे नागरिक व त्यांचे वारसदार भारताच्या या उपकारांबद्दल आजही कृतज्ञता बाळगतात. जेव्हा जगात कोणी मदतीला येत नव्हते तेव्हा भारताने, विशेषतः कोल्हापूर व जामनगर संस्थानांनी सर्वतोपरी मदत केली, अशी भावना ते व्यक्त करतात.

गावातील सोयीसुविधा

कोल्हापूरच्या महाराजांनी उपलब्ध करून दिलेल्या सुमारे २५० एकर भूभागावर एक गावच वसविले गेले. मुंबईच्या हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीने या गावाची रचना कलात्मकतेने केली. १० हजार निर्वार्सितांसाठी १२ घरांचा एक अशी १४० गृहसंकुले, ७५० स्नानगृहे, १ गोदाम, कर्मचाऱ्यांसाठी १० ब्लॉक्स, पोस्ट ऑफिस, चर्च, क्रीडांगणे, तीन बालवाड्या, आदी सुविधा होत्या. वळीवड्यात २०० खाटांचे रुग्णालयही होते.जेमतेम वर्षभराच्या आत हा कॅम्प तयार होऊन ८ जानेवारी १९४४ रोजी त्याचे उद्‍घाटनही करण्यात आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Archery World Cup : तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत भारतीयांचा डंका! पुरुष आणि महिला कंपाऊंड संघांनी पटकावली सुवर्णपदके

Latest Marathi News Live Update: तामिळनाडूमध्ये बसचा अपघात; १५ जखमी

Tesla Layoffs: इलॉन मस्कच्या कंपनीत चाललंय काय? आणखी काही कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

Baba Ramdev: पतंजली समूह नवीन कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत; काय आहे बाबा रामदेव यांचा प्लॅन?

Raw Mango: उन्हाळ्यात कैरीचा थंडगार कचुंदा घरीच नक्की करा ट्राय, जाणून घ्या रेसिपी

SCROLL FOR NEXT