Lalu Prasad Yadav fell down Shoulder fracture
Lalu Prasad Yadav fell down Shoulder fracture Lalu Prasad Yadav fell down Shoulder fracture
देश

आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव पायऱ्यांवरून पडले; खांदा फ्रॅक्चर

सकाळ डिजिटल टीम

बिहार : आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) हे पायऱ्यांवरून पडले. त्याच्या खांद्याला आणि हाताला गंभीर दुखापत झाली. यानंतर घाईघाईत लालू प्रसाद यादव यांचा आज एका खासगी रुग्णालयात एमआरआय करण्यात आला. त्यांच्या खांद्याच्या हाडात हेअरलाइन फ्रॅक्चर (Shoulder fracture) झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांना दोन महिने बेड रेस्ट सांगितल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

लालू प्रसाद यादव सध्या पाटणा येथील राबडी देवीचे अधिकृत निवासस्थान १० सर्कुलर रोड येथे राहतात. यातच त्यांच्या खांद्यावर व हाताला गंभीर दुखापत झाली आहे. पायऱ्या उतरत असताना लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांचा तोल गेला आणि ते पडले, असे सांगण्यात येत आहे. त्यांच्या हाताला आणि खांद्यासोबतच (Shoulder) कमरेलाही दुखापत झाली आहे.

आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांची प्रकृती खराब राहते. रांची तुरुंगात असताना त्यांना अनेक वेळा RIMS मधून दिल्ली AIIMS मध्ये पाठवण्यात आले. चारा घोटाळ्यात शिक्षा भोगत असलेले लालू प्रसाद यादव जामिनावर बाहेर आले आहे. डोरंडा ट्रेझरीशी संबंधित चारा घोटाळ्याप्रकरणी विशेष सीबीआय न्यायालयाने त्यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. याशिवाय ६० लाखांचा दंडही ठोठावला आहे.

लालू प्रसाद यादव यांच्या उजव्या खांद्याचे हाड पडल्याने तुटले आहे. सोबतच त्याच्या कमरेलाही दुखापत झाली आहे. लालू प्रसाद यादव यांच्यावर कंकरबाग येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. प्लास्टर केल्यानंतर लालू प्रसाद यादव यांना घरी आणण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तपासणीअंती घाबरण्यासारखे काही नसल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

Omprakash Raje Nimbalkar : जनतेनेच निवडणुक हाती घेतल्याने विजयाचा मार्ग सुकर - ओमराजे निंबाळकर

Lok Sabha Election : पहिल्या उमेदवारावर विश्वास नसल्याने दोन फॉर्म भरण्यात आले; राजेश मोरे यांची ठाकरे गटावर टीका

Champions Trophy 2025: 'तर पाकिस्तानला न येण्याचं लॉजिकल कारण द्या', भारतीय संघाच्या भूमिकेबाबत माजी क्रिकेटरचं स्पष्ट वक्तव्य

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

SCROLL FOR NEXT