Land Jihad, Said Bajrang Dal Sakal
देश

लव्ह जिहादनंतर आता लँड जिहाद! जाणून घ्या काय आहे प्रकार

लव्ह जिहादची (Love Jihad) देशभरात चर्चा सुरू असतानाच मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात आजकाल 'लँड जिहाद'ची (Land Jihad) चर्चा सुरू आहे.

सकाळ डिजिटल टीम

लव्ह जिहादची देशभरात चर्चा सुरू असतानाच मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात आजकाल 'लँड जिहाद'ची चर्चा सुरू आहे. छतरपूर जिल्ह्यात लँड जिहाद सुरू असून जिल्हा प्रशासन मूकपणे या घटनांकडे बघत असल्याचा आरोप बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. जिल्हा प्रशासनावर अतिक्रमण हटवत नसल्याबाबत व पक्षपातीपणाने वागणूक देत असल्याचा आरोप करत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. कार्यकर्त्यांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आणि जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन दिले. त्याचबरोबर शहरात सुरू असलेले अतिक्रमण कोणताही भेदभाव न करता हटवावे, असे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. (Land jihad after love jihad! Bajrang Dal's allegation – some community occupying land in Chhatarpur)

विशिष्ट समाजाचे लोक जमिनींवर कब्जा करत असल्याचा आरोप-

बजरंग दलाचे जिल्हा समन्वयक सुरेंद्र शिवहरे यांनी म्हटले आहे की, लँड जिहाद अंतर्गत जिल्ह्यात जमिनी बळकावल्या जात आहेत. परिसरात सुनियोजित कटाचा एक भाग म्हणून विशिष्ट समाजाच्या लोकांनी जमिनीवर कब्जा केला असून जिल्हा प्रशासन त्यांच्यावर कोणतीही कारवाई करत नाही. याबाबत बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी अधिकाऱ्यांना निवेदन दिले.

तर दुसरीकडे अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू असून कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण असेल तरी ते काढले जाईल, असे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune court verdict : पत्नीशी दोनदा घटस्फोट, तिसऱ्यांदा लग्नाचं वचन देत केला बलात्कार? ; पुणे कोर्टाने पतीला सोडलं निर्दोष, कारण...

Viral Video: महिला पोलिसाचं धाडस! महाकाय १६ फूट लांब किंग कोब्रा पकडला, पाहा थरारक व्हायरल व्हिडिओ

Latest Maharashtra News Updates : दिलीप काळभोर यांचा सभापतीपदाचा राजीनामा

Navi Mumbai: रिल्स बनवण्यासाठी रेल्वेवर चढला, इतक्यात ओव्हरहेड वायरला चिटकला अन्...; क्षणात आयुष्य उद्ध्वस्त

SA vs ZIM: कसोटी क्रिकेटला मिळावा नवा 'त्रिशतकवीर'! द. आफ्रिकेच्या कर्णधाराने गोलंदाजांना झोडपत नोंदवले वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT