Laser Pointed At Rahul Gandhi Security Breach Congress Tells Government
Laser Pointed At Rahul Gandhi Security Breach Congress Tells Government 
देश

'राहुल गांधी यांच्यावर स्नाईपर हल्ल्याची भीती' (व्हिडिओ)

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, याबाबत काँग्रेसने गृहमंत्री राजनाथ सिंह यांना एक पत्र लिहून त्यात राहुल गांधी यांच्या सुरक्षेत ढिलाई होत असल्याचे म्हटले आहे. अमेठीमध्ये झालेल्या राहुल गांधी यांच्या रोड शोमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर हिरवा लेझर लाईट आढळल्याने काँग्रेसने स्नाईपर हल्ल्याची भीती व्यक्त केली आहे.

अमेठीमधील रोड शोनंतर राहुल गांधी पत्रकारांशी बोलत असताना त्यांच्या चेहऱ्यावर हिरव्या रंगाचा लेझर लाईट पडलेला व्हिडिओमध्ये दिसत आहे. ही लेझर लाईट स्नायपर गनची लाईट असावी, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचा पुरावा म्हणून काँग्रेसने गृहमंत्रालयाकडे या घटनेचा व्हिडिओ देखील पाठवला आहे. काँग्रेसने सादर केलेला हा व्हिडिओ 15 सेकंदांचा असून, यामध्ये अनेकदा राहुल गांधी यांच्या चेहऱ्यावर लेझर लाईट मारल्याचे स्पष्ट दिसते आहे. मात्र, या व्हिडिओची सत्यता समोर आलेली नाही. राफेलप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या निर्णयावर राहुल गांधी माध्यमांना प्रतिक्रिया देत असताना हा प्रकार घडला होता. लेझर लाईटबद्दल काँग्रेस नेते अहमद पटेल, रणदीप सुरजेवाला यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला पत्र लिहून भीती व्यक्त केली आहे. शिवाय, या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणीही पत्रात करण्यात आली आहे.

देशातील अतिमहत्वाच्या व्यक्तींना एसपीजी सुरक्षा पुरवली जाते. त्यामुळे संपूर्ण गांधी कुटुंबाला देखील ही सुरक्षा दिली जाते. कडक सुरक्षा व्यवस्था असतानाही हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. भारताचे दोन माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांच्यासोबत घातपात झाला होता. 1991 साली लोकसभा निवडणुकांच्या काळातच राजीव गांधी यांची हत्या करण्यात आली होती. काँग्रेसने गांधी कुटुंबांच्या सुरक्षेत ढिलाई झाल्याचे गृहमंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, लेझरऐवजी उन्हामुळे माईक-कॅमेराचे परावर्तन झाल्याचीही शंका व्यक्त केली जात आहे. काँग्रेसच्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे, हे लवकरच समोर येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

Commuter Murder Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये प्रवाशाची हत्या! गर्दुल्यांकडून ट्रेनमध्ये हैदोस

Latest Marathi News Live Update: अमेठीत राहुल गांधींच्या उमेदवारीची चर्चा; कार्यकर्त्यांनी पोस्टर्सही छापले

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : हैदराबाद पुन्हा 200 पार! रेड्डी अन् क्लासेननं स्लॉग ओव्हरमध्ये राजस्थानला धुतलं

SCROLL FOR NEXT