

Premium petrol price
ESakal
जर तुम्हीही तुमच्या कार किंवा बाईकसाठी हे विशेष इंधन वापरत असाल, तर ही बातमी थेट तुमच्या खिशाशी संबंधित आहे. तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) २० मार्च २०२६ पासून प्रीमियम पेट्रोलच्या दरात वाढ केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या इंधनाच्या दरात प्रति लिटर २ ते २.३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. हा बदल आज सकाळी ६ वाजल्यापासून देशभरात लागू झाला आहे.