Marathi News LIVE Updates eSakal
देश

Latest Marathi News: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या राज्यातील शिवसेना आमदारांच्या अपात्रताप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल ऐतिहासिक निकाल दिला.

सकाळ डिजिटल टीम

Modi Maharashtra Visit: पंतप्रधान मोदींचा उद्याचा महाराष्ट्रातील दौरा कसा असेल?

पंतप्रधान मोदींचा महाराष्ट्रातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे असेल

सकाळी 11.15 वाजता नाशिकच्या काळाराम मंदिरात दर्शनाला जातील.

दुपारी 12.15 वाजता ते नाशिकमध्ये 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उदघाटन करतील.

दुपारी 3.30 वाजता ते एमटीएचएलचे उदघाटन करतील आणि या अटलसेतूवरुन प्रवास करीत नवी मुंबईतील सभास्थळी जातील.

दुपारी 4.15 वाजता नवी मुंबईतील सभास्थानी विविध प्रकल्पांचे लोकार्पण, उदघाटन, शुभारंभ, भूमिपूजन करतील आणि सभेला संबोधित करतील.

त्यानंतर मुंबई विमानतळावर येऊन सायं. 6 च्या सुमारास नवी दिल्लीला रवाना होतील.

Narendra Modi: महाराष्ट्रात येण्याआधी मोदींची खास पोस्ट

पंतप्रधान मोदी हे उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांनी ट्विट करत म्हटलंय की, उद्या मा जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे. महाराष्ट्रात येण्यासाठी मी उत्सुक आहे.

Congress: महाराष्ट्रात आणि देशात पुन्हा काँग्रेसची सत्ता येईल- रमेश चेन्नीथला

भारतीय जनता पक्षाच्या सरकारविरोधात देशभरात मोठा आक्रोश आहे. देशाची एकता व अखंडता मोडीत काढण्याचे काम भाजपा सरकारने मागील दहा वर्षात केले आहे. जातीय तणाव निर्माण करून भाजपा सामाजिक सौहार्द बिघडवत आहे. विरोधीपक्षांना घाबरवण्यासाठी ईडी, सीबीआयचा गैरवापर केला जात आहे पण भाजपाच्या या दडपशाहीसोर काँग्रेस डगमगली नाही. महाराष्ट्र हे काँग्रेस विचाराचे राज्य आहे. एकजुटीने काम केले तर महाराष्ट्रात व देशात पुन्हा काँग्रेसची सत्ता येईल, असा विश्वास प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी व्यक्त केला आहे.

काँग्रेस कार्यकारिणीच्या विस्तारित बैठकीत रमेश चेन्नीथल्ला यांनी मार्गदर्शन केले व त्यानंतर पत्रकार परिषदेला संबोधित केले.

PM Modi: 24 जानेवारीला पंतप्रधान मोदी नवमतदारांना संबोधित करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी २४ जानेवारीला देशभरातील जवळपास ५० लाख नवमतदारांना संबोधित करणार आहेत. व्हर्च्युअल पद्धतीने ते नवमतदारांशी संवाद साधतील.

PM मोदींचा असा असणार नाशिक दौरा; महाजनांनी दिली सविस्तर माहिती

राम मंदिराचं आधी बांधकाम पूर्ण करा मग उद्घाटन - दिग्विजय सिंह

मोदींच्या हस्ते उद्या मुंबईत अटल सेतूचं उद्घाटन; आशियातला सर्वात लांब समुद्रावरचा पूल

मुंबई : एमएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी म्हणाले, "१२ जानेवारी रोजी पंतप्रधान मोदी अटल सेतू-मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे उद्घाटन करतील. समुद्रावर बांधलेला हा भारतातील सर्वात लांब पूल आहे, अशा अनेक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. भारतात पहिल्यांदाच या पुलाच्या उभारणीत खास तंत्रज्ञान वापरण्यात आलं आहे. या पुलामध्ये वापरण्यात आलेले दिवे जलचरांना त्रासदायक ठरणार नाहीत"

३१ जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनला होणार सुरुवात

मोदींच्या दौऱ्यापूर्वी CM शिंदेंची काळाराम मंदिराची पाहाणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. यामध्ये पहिल्यांदा नाशिक आणि नंतर मुंबईत त्यांचा दौरा असणार आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकच्या पुरातन काळाराम मंदिरात देखील जाऊन पाहणी केली आणि सर्व तयारीचा घेतला आढावा. पंतप्रधान मोदी काळाराम मंदिरात श्रीरामाचं दर्शन घेऊन आरती करणार आहेत.

पुण्याच्या हडपसरमध्ये दहशद माजवण्यासाठी गाड्यांची तोडफोड

पुण्याच्या हडपसरमध्ये काही गुंडांकडून गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. नागरिकांनी पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे.

जळगावचे श्रीराम पाटील अजित पवार गटात जाणार

जळगावचे श्रीराम पाटील अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत.

मोदींच्या सभेच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशकात

उद्या नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा पार पडणार आहे. या सभेच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिकमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी सभेच्या तयारीचा आढावा घेतला.

डीएड बीएडच्या विद्यार्थ्यांनी अडवली चंद्रकांत पाटील यांची गाडी

डीएड आणि बीएडच्या विद्यार्थ्यांकडून चंद्रकांत पाटील यांची गाडी अडवून घोषणा देण्यात आल्या आहेत. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षक भरतीत इंग्रजी माध्यमांचे आरक्षण रद्द करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.

दोन सख्या भावांना मिळाला स्वच्छ भारत पुरस्कार

नवी दिल्ली स्वच्छ भारत पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुरमू यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात दोन सख्या भावांना पुरस्कार मिळाला. त्यातील 1 भाऊ आमदार तर 1 भाऊ अधिकारी आहे. राजेंद्र जगताप IDES अधिकारी, संजय जगताप आमदार पुरंदर, असे दोन भावंचे नाव आहे.

Delhi Earthquake: दिल्ली NCR मध्ये जाणवले भूकंपाचे धक्के

दिल्ली NCR मधे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नोयडा, गुरूग्राम भागात देखील धक्के जाणवले. अफगाणिस्तानातील फैजाबाद मध्ये भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची माहिती समोर आली आहे. अफगाणिस्तानातील सीमा भागात मोठे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता 6.2 रजिस्टर स्केल एवढी आहे.

Crime Update: गोंदियात माजी नगरसेवकावर गोळीबार

गोंदिया येथील माजी नगरसेवक लोकेश (कल्लू) यादव यांच्यावर गुरुवारी ( ता. ११) सकाळी ११ वाजताच्या सुमारास तीन अज्ञात जणांनी गोळीबार केला. यादव यांच्याच घराजवळील हेमू कॉलनी चौकात ही घटना घडली. ते शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख पंकज यादव यांचे बंधू आहेत. यादव हे दुचाकीने बाहेर जात असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला.

Uddhav Thackeray: बाळासाहेबांच्या विचारांना उद्धव ठाकरेंनी तिलांजली दिली - एकनाथ शिंदे

बाळासाहेबांच्या विचारांना उद्धव ठाकरेंनी तिलांजली दिली. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचे सरकार स्थापन केले, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

शिवसेना प्रवक्त्या शितल म्हात्रेंकडे सोपवली मोठी जबाबदारी

शिवसेना प्रवक्त्या शितल म्हात्रे यांची महिला सेना विभागीय संपर्क नेते पदी निवड करण्यात आली आहे. शितल म्हात्रे यांच्यावर कोकण विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर ठाकरे गटात जुंपली

विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर ठाकरे गटात जुंपली आहे. २०१८ मध्ये घटनेत केलेल्या बदलावरुन खडाजंगी झाली. अनिस देसाई आणि सुभाष देसाईंना धारेवर धरलं. निवडणूक आयोगात नोंद का नाही? असा सवाल बैठकीत करण्यात आला.

PM Modi Nashik Visit : CM शिंदे, फडणवीस तातडीच्या नाशिक दौऱ्यावर 

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तातडीच्या नाशिक दौऱ्यावर गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेच्या नियोजनासाठी स्वतः मुख्यमंत्री नाशिकमध्ये दुसऱ्यांदा पाहणी करणार आहेत. तर फडणवीस देखील मोदींच्या सभेच्या तयारीचा आढावा घेणार आहेत.

उद्या नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आणि रोड शो होणार आहे. राम मंदिर दर्शन, गोदावरी पूजन असे भरगच्च कार्यक्रम असणार आहेत .

Parliament Session : संसदेच अर्थसंकल्पीय अधिवेशन ३० जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान होण्याची शक्यता

नवी दिल्ली : संसदेच अर्थसंकल्पीय अधिवेशन ३० जानेवारी ते ९ फेब्रुवारी दरम्यान होण्याची शक्यता आहे. १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन या हा अर्थसंकल्प मांडणार आहेत. त्यापूर्वी ३१ जानेवारीला राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार आहेत.

Talathi Barti : तलाठी भरती घोटाळ्याची एसआयटी चौकशीसाठी काँग्रेसचं पुण्यात आंदोलन

तलाठी भरती महाघोटाळ्याची S.I.T. मार्फत चौकशी व्हावी आणि एमपीएससी 2024 जाहिरातीत सर्व संवर्गातील जागा वाढ करावी यामागणीसाठी सरकार विरोधात काँग्रेसकडून पुण्यात आक्रमक आंदोलन करण्यात आलं आहे.

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरा जवळ काँग्रेसचे कार्यकर्ते यांनी ठिय्या मांडला होता. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना रस्त्यावर येऊ नका असे आवाहन केले मात्र त्यानंतर सुद्धा आक्रमक झालेल्या काँग्रेसकर्त्यांनी रस्त्यावर राडा घातला.

mansukh hiren death case : मनसुख हिरेन हत्या प्रकरणात गुन्ह्यातून दोषमुक्तीसाठी NIA कोर्टात याचिका

मनसुख हिरेन हत्या प्रकरणी गुन्ह्यातून दोषमुक्त करण्यासाठी एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांची याचिका दाखल करण्यात आली आहे. विशेष एनआयए कोर्टात ही याचिका दाखल केली आहे. सुप्रीम कोर्टाने प्रदीप शर्मा यांना जामीन मंजुर केला आहे. याप्रकरणी NIA कोर्टात सुनावणी सुरू आहे.

Shivsena : नागपुरात नार्वेकरांनी दिलेल्या निकालाविरोधात ठाकरे गट करणार आंदोलन

नागपुरात शिवसेना उबाठा गटाकडून विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निकाला विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे. रेशीमबाग परिसरात उबाठाच्या कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात येणार असून किशोर कुमेरिया यांच्या नेतृत्वातील हे आंदोलन होणार आहे..

Ayodhya Ram Mandir : २२ जानेवारीला गोव्यात सरकारी कार्यालयांना सुट्टी जाहीर

२२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत प्राण प्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या दिवशी गोव्यात सरकारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 22 जानेवारी रोजी राम मंदिर उद्धटन दिनानिमित्त महाराष्ट्रामध्ये दिवाळी साजरी झाली पाहिजे अशी घोषणा करण्यात आली आहे. यासाठी आता सरकारच्या वतीने सर्व नागरिकांना मोफत आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे.

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या मशाल चिन्हावर समता पक्षाचा दावा

उद्धव ठाकरेंच्या मशाल चिन्हावर समता पक्षाचा दावा केला आहे. निवडणूक आयोगाच्या नव्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे समता पक्षाला मशाल चिन्हासाठी अर्ज करण्याचा अधिकार असल्याचा दावा समता पक्षाने केला आहे .

Nawab Malik: नवाब मलिकांना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मनी लाँन्ड्रीग प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडून नवाब मलिक यांना सहा महिन्यासाठी जामीन मंजूर करण्यात आला आहे.

Annapoorani: 'अन्नपूर्णी' विरोधात मुंबईत विश्व हिंदू परिषद आक्रमक, झेंडे फडकावत केला निषेध

मुंबईत गुरुवारी सकाळी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलंय. नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या 'अन्नपूर्णी' या चित्रपटातील भगवान राम यांच्याविरोधातील वादग्रस्त संवादांवरून जोरदार निदर्शने करण्यात आली. विश्व हिंदू परिषदेच्या सदस्यांनी कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करत नेटफ्लिक्सवरुन चित्रपट काढण्याची मागणी केली.

Congress : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस लागली कामाला

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून तयारी सुरु आहे. पुण्यात काँग्रेसची विभागीय बैठक होणार आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पश्चिम विभागातील सर्व जिल्हा कमिटी यांची बैठक होणार आहे.

Thane: जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध ठाण्यात गुन्हा दाखल!

जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध ठाण्यातील वर्तक नगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रभु श्रीरामचंद्र यांचे बाबत राम हा शाकाहारी नव्हता तो मांसाहारी होता असे विधान केले त्यांनी केले होते. प्रभू श्रीराम यांच्या बद्दल अपमान जनक वक्तव्य केल्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या म्हणून ठाण्यातील महिलेने आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Navi Mumbai: पगार न झाल्याने नवी मुंबई मेट्रो तिकीट खिडकी कर्मचारी संपावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी नवी मुंबई मेट्रो लोकार्पण सोहळा होणार आहे. दरम्यान तिकीट कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नसल्याचे कारण देत गुरुवार सकाळ पासून संप पुकारला असून मेट्रो कारशेडच्या प्रवेशद्वारावर बसले आहे. जो कर्मचाऱ्यांच्या मागणी पूर्ण केली जात नाही. तो पर्यंत कामावर हजर होणार नाही. अशी भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतल्याचे समजले.

PM to visit Kalaram Temple : पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार काळा राम मंदिराचं दर्शन 

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी ते नाशिक शहरात जाणार असून ते काळाराम मंदिरात जाऊन प्रभू श्रीरामांचं दर्शन घेणार आहेत.

Sanjay Raut: एकनाथ शिंदेंनी घराणेशाहीवर बोलू नये, त्यांचा मुलगा खासदार आहे - संजय राऊत 

एकनाथ शिंदे यांनी घराणेशाहीवर बोलू नये, त्यांचा मुलगा खासदार आहे उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिली म्हणून तो आज खासदार आहे. असे खा. संजय राऊत पत्रकार परिषदेत म्हणाले.

Sunil Kedar: काँग्रेस नेते सुनील केदार यांच्यासह पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणात काँग्रेस नेते आणि माजी मंत्री सुनील केदार यांना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला. न्यायालयाने जामीन मंजूर होताच काल (बुधवार, १० जानेवारी) त्यांची जेलमधून सुटका झाली. सुनील केदार यांच्या सुटकेनंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी भव्य रॅली काढत जल्लोष केला. या रॅलीप्रकरणी आता मंत्री सुनील केदार यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

NCP Political Crisis: अजित पवारांनी शरद पवारांसोबत एकत्र येणं टाळलं?

शरद पवार आणि अजित पवार आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त एकत्र येणार होते. पण अजित पवार कार्यक्रमाला येणार नाहीत अशी माहिती समोर आली आहे. यापूर्वीही नाट्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला अजित पवार आणि शरद पवारांनी एकत्र येणं टाळलं होतं.

Sharad Mohol : शरद मोहोळ खुन प्रकरणातील मोठी माहिती आली समोर

शरद मोहोळ खुन प्रकरणी नवी माहिती समोर आली आहे. पिस्टल पुरवणाऱ्या दोघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. गोळीबार करण्यापूर्वी आरोपींनी मुळशीत ३ वेळा सराव केला आहे. शरद मोहोळ याचा पुण्यातील त्याच्या राहत्या घराजवळ गोळ्या झाडून खून करण्यात आला होता.

या प्रकरणात पुणे पोलिसांनी आणखी २ जणांना अटक केली. या दोघांनी खून करण्यासाठी वापरण्यात आलेले पिस्टल आरोपींना पुरवले असल्याची माहिती आहे. धनंजय मारुती वटकर आणि सतीश संजय शेडगे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

शरद मोहोळचा ५ जानेवारी भरदुपारी सुतारदरा येथील घरासमोर त्याच्यासोबत असलेल्या साहिल उर्फ मुन्ना पोळेकर व साथीदारांनी गोळ्या झाडून खून केला होता. या आरोपींनी मुळशी तालुक्यात तीन वेळा वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार करण्याचा सराव केला होता. या गुन्ह्यात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे.

BJP President K Annamalai : दोन गटांत धार्मिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी भाजप अध्यक्षावर गुन्हा दाखल

तामिळनाडू : धर्मपुरी पोलिसांनी दोन गटांमधील धार्मिक शत्रुत्वाला प्रोत्साहन दिल्याच्या आरोपाखाली धर्मपुरी जिल्ह्यातील बोम्मीडी पोलीस ठाण्यात कलम १५३ (ए), ५०४, ५०५ (२) अंतर्गत राज्य भाजप अध्यक्ष के. अन्नामलाई यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. अन्नामलाई यांच्या विरोधात ख्रिश्चन तरुणांच्या एका गटाशी झालेल्या भांडणाबद्दल गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Republic Day Parade : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर कर्तव्यपथावर परेडची रंगीत तालीम

दिल्लीतील कर्तव्यपथावर प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर परेडची रंगीत तालीम सुरू आहे. यात आर्मी, महिला पोलिस, एनसीसी कॅडेट्स यांचा मोठा सहभाग पहायला मिळत आहे.

NCP Leader : शरद पवार-अजित पवार आज एकत्र येण्याची शक्यता

पुणे - शरद पवार आणि अजित पवार आज एकत्र येण्याची शक्यता आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेनिमित्त एकत्र येणार असल्याचं कळतंय. यापूर्वी नाट्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला अजित पवार आणि शरद पवारांनी एकत्र येणं टाळलं होतं. आज पुन्हा हे दोन्ही नेते एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाला दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील उपस्थित राहणार आहेत.

Bharat Jodo Nyay Yatra : ..अखेर राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेला मणिपूर सरकारची परवानगी

मणिपूर : राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला मणिपूर सरकारने परवानगी दिली आहे. काल रात्री उशिरा ही परवानगी मिळाली. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था पाहता यात्रेत मोजकेच लोक दाखल व्हावेत. यात्रेदरम्यान जास्त गर्दी होणार नाही, याची खबरदरी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. १४ जानेवारीला इंफाळ मधून ही यात्रा सुरू होणार असून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे या यात्रेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत.

Delhi : दाट धुक्यामुळं दिल्लीला जाणाऱ्या ट्रेन धावताहेत उशिराने

सध्या देशभरातील वातावरणात बदल जाणवत आहे. दाट धुक्यामुळं देशाच्या विविध भागातून दिल्लीला जाणाऱ्या ट्रेन उशिराने धावताना दिसत आहेत.

Shivsena MLA Disqualification Case : विधानसभा अध्यक्षांच्या ऐतिहासिक निकालानंतर काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

मुंबई : आजचा निर्णय सगळ्यांचा आहे. आधीपासून मुख्यमंत्री आज जाणार, परवा जाणार असं सारखे बोलत होते. परंतु, अजून पर्यंत मी कायम आहे.

पक्षांमध्ये प्रायव्हेट प्रॉपर्टी म्हणून वापरत होते, परंतु असं करू शकत नाही म्हणून हा मोठा झटका त्यांना मिळालेला आहे.

हुकूमशाही पद्धतीने पार्टी चालवणाऱ्या लोकांना हा मोठा झटका देण्यात आलेला आहे.

लोकसभा निवडणूकमध्ये 45 प्लस या ठिकाणी सीट जिंकून येणार आहोत.

हा लोकशाहीचा विजय आहे. महाराष्ट्रातील तमाम जनतेचा विजय आहे.

आजचा जो निर्णय झालेला आहे, तो प्रत्येक ठिकाणी एक माइल स्टोन ठरणार आहे.

पक्ष अनियमित लोकशाही पद्धतीने चालवला पाहिजे. हा निर्णय जनतेच्या दृष्टीने खूप योग्य आहे.

2019 मध्ये ज्यांनी जनतेसोबत बेइमानी केली, त्यांना ही मोठी चपराक आहे.

2019 साली त्यांनी बाळासाहेबांचे विचार विकले आणि काँग्रेसला जवळ करुन सत्ता स्थापन केली.

हा प्रभू श्रीरामांनी दिलेला आशीर्वाद आहे. 22 तारखेच्या आधी या ठिकाणी निर्णय मिळाला व सर्व जनतेला न्याय मिळाला.

कोकणात सलग तिसऱ्या दिवशीही पाऊस; नुकसानीच्या तडाख्याने शेतकरी, बागायतदारांच्या तोंडचे पळालेले पाणी

राजापूर : परवा रात्री आणि त्यानंतर काल दिवसभर झालेल्या अवकाळीने पावसाने आज तिसऱ्या दिवशीही पिच्छा सोडलेला नाही. बुधवारी सकाळपासून दिवसभर ढगाळ वातावरण असताना सायंकाळी मात्र काही मिनिटांसाठी पुन्हा एकदा तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस पडला. सलग तिसऱ्या दिवशी पडलेल्या अवकाळी पावसामुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीच्या तडाख्याने शेतकरी, बागायतदार यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे.

Maratha Community : सकल मराठा समाजाची शनिवारी बैठक

कोल्हापूर : मराठा योद्धा मनोज जरांगे- पाटील यांच्या मुंबई येथील मोर्चा आंदोलनात ताकदीने सहभागी होण्यासाठी तालुका व गाववार नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील, शहर व गाव पातळीवरील सकल मराठा कार्यकर्त्यांची बैठक १३ जानेवारीला सायंकाळी चार वाजता दैवज्ञ समाज बोर्डीग, मिरजकर तिकटी येथे आयोजित केली आहे. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन समन्वयक वसंत मुळीक यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

Defence Minister Rajnath Singh : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी घेतली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची भेट

यूके : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची लंडन येथे भेट घेतली. यावेळी दोघांनी एकमेकाशी संवाद साधला

सोनिया गांधी, खर्गेंनी राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचे निमंत्रण नाकारले

Latest Marathi News Live Update : अवघ्या देशाचे लक्ष लागून राहिलेल्या राज्यातील शिवसेना आमदारांच्या अपात्रताप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल ऐतिहासिक निकाल दिला. शिंदे अथवा ठाकरे गटापैकी कोणालाच अपात्र ठरविण्यात आलेले नसले तरीसुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाच गट हा ‘मूळ शिवसेना’ असल्याचा निर्वाळा देत त्यांनी राज्यातील राजकीय अस्थैर्य संपुष्टात आणले. या निकालावर सत्ताधारी गटाने समाधान व्यक्त केले असले, तरीसुद्धा ठाकरे गट मात्र याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेणार आहे.

तसेच अयोध्येत येत्या 22 जानेवारीला होत असलेल्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास काँग्रेसचे नेते उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेसच्या संसदीय दलाच्या अध्यक्ष सोनिया गांधी, पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते अधीररंजन चौधरी हे या सोहळ्यात सहभागी होणार नाहीत. राममंदिर न्यास समितीने त्यांना अधिकृत निमंत्रण पाठविले होते. त्याचबरोबर संशोधन शिष्यवृत्तीसाठी आयोजित केलेल्या चाळणी परीक्षेत पुन्हा गोंधळ झाला. बार्टी, सारथी व महाज्योती संस्थांच्या चाळणी परीक्षेत दोन प्रकारच्या प्रश्नपत्रिका दिल्याने संभ्रम निर्माण झाला. परिणामी, विद्यार्थ्यांनी पुण्यासह राज्यातील इतर केंद्रांवरही परीक्षेवर बहिष्कार टाकत पेपर फुटल्याचा दावा केला. तसेच देशातील वातावरणात बदल पहायला मिळत असून ठिकठिकाणी पाऊस पडत आहे. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दाही गाजत असून मनोज जरांगे-पाटील मुंबईमध्ये आंदोलन करण्यावर ठाम आहेत. देशभरात पुन्हा कोरोना विषाणूने थैमान माजवले आहे. यासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडीचा आपण 'लाईव्ह ब्लाॅग'च्या माध्यमातून आढावा घेणार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT