Whatsapp 
देश

लोकांचा संभ्रम दूर करू; व्हॉट्सॲपचे स्पष्टीकरण

वृत्तसंस्था

नवी दिल्ली - भारत सरकारने उघड नाराजी व्यक्त केल्यानंतर व्हॉट्सॲप या मेसेजिंग ॲपने प्रस्तावित गोपनीयता धोरणाबाबत सावध भूमिका घेतली आहे. या धोरणामुळे लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून तो दूर करण्यासाठी कंपनी काम करते आहे. लोकांच्या सर्व प्रश्‍नांना उत्तरे देण्यासाठी आम्ही तयार आहोत, असे कंपनीकडून सांगण्यात आले. केंद्र सरकारने व्हॉट्सॲपच्या गोपनीयता धोरणाला आक्षेप घेत कोणत्याही स्थितीमध्ये त्याची अंमलबजावणी केली जाऊ नये असे म्हटले होते. हे नवे धोरण आम्हाला अस्वीकारार्ह असल्याचेही सरकारकडून सांगण्यात आले होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नव्या धोरणाच्या माध्यमातून लोकांना अधिक पारदर्शक सेवा देण्याबरोबरच उद्योगांसाठी नवे पर्याय उपलब्ध करून देण्यावर आमचा भर राहणार आहे. या नव्या धोरणामुळे आमची डेटा शेअरिंगची क्षमता वाढणार नाही पण त्याचा उद्योजक आणि ग्राहकांना मोठा फायदा होईल असे कंपनीने म्हटले आहे. व्हॉट्सॲपकडून खासगी संदेशांची गोपनीयता नेहमीच कायम ठेवली जाते.

त्यामुळे व्हॉट्सॲप असो की फेसबुक या कंपन्यांना हे मेसेज पाहणे शक्य होत नाही, असेही कंपनीच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. तत्पूर्वी इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने व्हॉट्सॲपचे सीईओ विल कॅथकार्ट यांना पत्र लिहिताना नाराजी व्यक्त केली होती.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लालबागच्या राजाच्या चरणी केलेलं दान कुणाच्या खिशात जातंय? अभिनेत्रीने ठेवलेली ५०० ची नोट गायब होताच, नेटकऱ्यांचा सवाल

INDW vs SLW Final : 'गोल्डन गर्ल्स'! भारतीय संघाने इतिहास रचला, श्रीलंकेला नमवून जिंकले दुसरे सुवर्णपदक; स्मृती, शफाली, रिचा चमकल्या

Hupari Rendal Police News : पत्नीच्या निधनाच्या नैराश्यातून रेंदाळमध्ये वृद्धाची आत्महत्या

IND vs JPN, T20I: जपानने भारतीय संघाचा धूर काढला! श्रेयसचा संघ अवघ्या २ धावांनी जिंकला, फलंदाज गंडले, गोलंदाजही रडले

Marathi News Live Updates : आयआयटी मुंबईबाहेर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

SCROLL FOR NEXT