India-America-Business
India-America-Business 
देश

आर्थिक निर्बंध कमी करू - ट्रम्प

पीटीआय

नवी दिल्ली - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज भारतातील प्रमुख उद्योगांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. या वेळी भारतीय उत्पादनांवरील निर्बंधांमध्ये आणखी घट करू, असे आश्‍वासन ट्रम्प यांनी उद्योगपतींना दिले.

भारताबरोबर संरक्षण करार झाल्यानंतर ट्रम्प यांनी उद्योगपतींची भेट घेतली. येथे बोलताना ट्रम्प म्हणाले की, आम्ही आत्ताच एक व्यवहार केला आहे. पंतप्रधान मोदी हे व्यवहारास फारच पक्के आहेत. पण, त्याच वेळी ते फार चांगलेही आहेत. आम्ही येथे नोकऱ्या निर्माण करतो, मोदी अमेरिकेत नोकऱ्या निर्माण करतात. सरकार केवळ नोकरी निर्माण करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देते, प्रत्यक्षात खासगी कंपन्याच नोकऱ्या देत असतात, असेही ट्रम्प यांनी सांगितले. आयातीवरील काही निर्बंध हटविण्यासाठी विशिष्ट प्रक्रियेतून जावे लागते. मात्र, आमचे सरकार लवकरच अनेक निर्बंध कमी करणार आहे, असे आश्‍वासन ट्रम्प यांनी दिले. भारताबरोबरील व्यापार कराराबाबत चर्चा सुरू असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. याबाबत अधिक माहिती मात्र त्यांनी दिली नाही.

या बैठकीला मुकेश अंबानी (रिलायन्स इंडस्ट्रीज), आनंद महिंद्रा (महिंद्रा ग्रुप), एन. चंद्रशेखरन (टाटा सन्स) आणि कुमार मंगलम बिर्ला (आदित्या बिर्ला ग्रुप) हे उद्योगपती उपस्थित होते. 

जागतिक अर्थव्यवस्थेसाठी लाभदायी
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी आणि जागतिक अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची आहे, अशी भूमिका अमेरिकेतील खासदारांच्या एका गटाने मांडली आहे. अनेक खासदारांनी ट्विट करून ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याबाबत प्रतिक्रिया दिल्या आहेत. भारत हा अमेरिकेचा मित्र आणि भागीदार देश असल्याचे या गटातील सिनेटर टेड क्रूझ यांनी म्हटले आहे. ‘मोदी-ट्रम्प भेट ही अर्थव्यवस्थेला बळकटी ठरणारी आहे. गेल्या वर्षी टेक्सासमध्ये मोदी यांचे स्वागत करण्याची संधी मला मिळाली होती,’ असे क्रूझ म्हणाले. तर, ‘ट्रम्प यांचे भारतात भव्य स्वागत झाल्याचे पाहून आनंद झाला. दोन्ही देशांच्या संरक्षण भागीदारीतून चांगले काही निष्पन्न होईल, अशी आशा आहे,’ असे मत खासदार पीट ओल्सन यांनी व्यक्त केले. ट्रम्प यांचे झालेले स्वागत हे दोन्ही देशांमधील दृढ मैत्री, भागीदारीचे प्रतीक आहे असेही काही खासदारांनी म्हटले आहे. या संदर्भात त्यांनी सोशल मिडियावर म्हणणे मांडले.

बर्नी यांची टीका
भारताशी संरक्षण करार करत अत्याधुनिक शस्त्रे दिल्याबद्दल सिनेटर बर्नी सँडर्स यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे. या कराराऐवजी अमेरिकेने पर्यावरण संरक्षणासाठी भारताशी करार करणे आवश्‍यक होते, असे त्यांनी म्हटले आहे.

दौऱ्याचा दुसरा दिवस

  • राष्ट्रपती भवन येथे मानवंदना स्वीकारली
  • राजघाट येथे महात्मा गांधीजींना आदरांजली
  • हैदराबाद हाउस येथे द्विपक्षीय चर्चा
  • भोजन समारंभाला उपस्थिती
  • भारतीय उद्योगपतींबरोबर चर्चा
  • दूतावासातील अधिकाऱ्यांबरोबर बैठक
  • राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याशी चर्चा
  • रात्री दहा वाजता जर्मनीकडे रवाना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT