llockdown worker made wooden car dragged pregnant wife and daughter 800 km hyderabad 
देश

अन् त्याने 800 किलोमीटर ओढली दोरी...

वृत्तसंस्था

हैदराबादः जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरवात केल्यानंतर देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. लॉकडाऊनमुळे अनेकजण विविध ठिकाणी अडकून पडले असून, रोजगार बंद झाल्यामुळे अनेकांचे हाल होताना दिसतात. काळीज पिळवटावून टाकणारे व्हिडिओ, छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

देशभरात लॉकडाऊनमुळे प्रवासाचे साधन बंद झाल्यामुले अनेकजण हजारो किलोमीटर चालत आपल्या घरी जाताना दिसतात. हजारो किलोमीटर चालल्यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. उन्हामध्ये अनेकजण आपल्या लहान मुलांना घेऊन चालत असल्याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल होत असून, अनेकजण प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. हैदराबादमधील एक छायाचित्र व्हायरल होत आहे. संबंधित छायाचित्र पाहून नेटिझन्स बापाचे कौतुक करत आहेत.

हैदराबादमध्ये एक दांपत्य कामानिमित्त आले होते. रामू असे या मजुराचे नाव आहे. लॉकडाऊनमध्ये काम बंद झाल्यामुळे रामूने आपल्या दोन वर्षांच्या मुलीला आणि गर्भवती पत्नीला घेऊन गावी जाण्याचा निर्णय घेतला. पण, प्रवासाचे साधन नसल्यामुळे काय करावे समजत नव्हते. शिवाय, हाताला काम नसल्यामुळे उपासमार होण्याच शक्यता होती. यामुळे त्यांनी बालाघाट या गावी जाण्याचा निर्णय घेतला. रामूने लाकडी गाडी तयार करून, त्यावर गर्भवती पत्नी व मुलीला बसवले आणि दहा-वीस नव्हे तर तब्बल 800 किलोमीटर प्रवासाला सुरवात केली. प्रवासादरम्यान अनेकजण त्यांच्याकडे पाहात होते. काहींचे मन हळहळत होते तर काहीजण मोबाईलमध्ये छायाचित्र काढत होते. प्रवासादरम्यान काहीजण खायला देत होते. तब्बल 17 दिवसांचा प्रवास करत हे दांपत्य आपल्या गाव पोहचले.

लांजीचे एसडीओपी नितेश भार्गव यांनी सांगितले की, "बालाघाट सीमेजवळ हे दांपत्य दिसले. लाकडी गाडीवर गर्भवती पत्नी आणि मुलीला बसवून तो गाडी ओढत असल्याचे पाहिले. शिवाय, लहान मुलीच्या पायात चप्पलही नव्हती. मुलीला चप्पल आणि बिस्किटे दिली, त्यानंतर त्यांना एक खासगी गाडीमधून सीमेजवळील खेड्यात पाठविले.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Dharashiv Railway: सोलापूर-धाराशिव रेल्वेमार्गाचे काम सुरू; तुळजाभवानी तीर्थक्षेत्र रेल्वे नकाशावर, पाठपुराव्याला यश!

T20 WC, IND vs PAK: विजय अन् थेट सुपर-८ चे तिकीट मिळवा; पण पाऊसामुळे सामना रद्द झालं तर काय?

India AI Impact Summit 2026 : सॅम ऑल्टमनसह जगातले २० दिग्गज दिल्लीत; आकाशात अँटी-ड्रोन गन ते जमिनीवर डिजिटल किल्ला, सुरक्षा पाहून थक्क व्हाल

Latest Marathi News Live Update : मुलुंड मेट्रो पूल दुर्घटना; अटक केलेल्या पाच जणांना आज भोईवाडा न्यायालयात हजर करणार

Mhada: भाड्याने घर घेणे सोपे होणार! म्हाडाचा मोठा निर्णय, नव्या धोरणाचा मसुदा सरकारदरबारी

SCROLL FOR NEXT