Narendra modi and Amit Shah Esakal
देश

Survey On NaMo App : भाजप खासदारांचं टेन्शन वाढलं! तिकीट देण्यापूर्वी ‘नमो’अ‍ॅप तपासणार लोकांचा मूड

लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना केंद्र सरकारने जनमताचा अंदाज घ्यायला सुरुवात केली आहे

रोहित कणसे

नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना केंद्र सरकारने जनमताचा अंदाज घ्यायला सुरुवात केली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या ‘नमो’ अ‍ॅपने मंगळवारपासून याबाबतचे सर्वेक्षण सुरू केले आहे. विद्यमान सरकारबाबत सामान्य लोक नेमका काय विचार करतात? स्थानिक खासदारांच्या कामगिरीबाबत ते समाधानी आहेत किंवा नाही? हे या सर्वेक्षणाच्या माध्यमातून जाणून घेण्यात येईल.

यासोबतच नागरिकांना त्यांच्या लोकसभा मतदारसंघातील तीन संभावित उमेदवारांची नावे देखील सुचवण्यास भाजपकडून सांगण्यात आले आहे. ज्यामुळे विद्यमान भाजप खासदारांची धाकधूक वाढली आहे.

‘जन मन सर्वे’ असे या सर्वेक्षणाचे नाव असून त्याद्वारे सरकारप्रती लोकांच्या मनात असलेली मते आणि नेतृत्वाबाबत त्यांना काय वाटते? हे जाणून घेतले जाईल. केंद्रीय पातळीवरील उपाययोजना आणि तसेच यूजरच्या मतदारसंघातील प्रश्नांचा या माध्यमातून आढावा घेण्याचा प्रयत्न करण्यात येईल. लोकांच्या मनातील भावना जाणून घेणारे हे नावीन्यपूर्ण सर्वेक्षण असल्याचे भाजपच्या नेत्यांनी सांगितले. लोकांपर्यंत पोचण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात यावा म्हणून पंतप्रधान मोदी हे विशेष आग्रही असतात. आताही त्याच तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

खासदारांचं टेन्शन वाढलं

भाजपकडून विधानसभा निवडणूकीच्या वेळी देखील आमदारांबद्दल सर्वे केले जातात, याच आधारावर तिकीटांचे वाटप होते. त्यामुळे खासदारांच्या या सर्वेमुळे अनेकांची चिंता वाढण्याची शक्यता आहे. भाजपने नुकतेच विधानसभा निवडणूकीत विजय मिळालेल्या तीन राज्यातील नेतृत्वात बदल केले आहेत.

या सर्व राज्यात नवीन चेहऱ्यांकडे मुख्यमंत्रीपद देण्यात आले आहे. त्यामुळे हायकमांडचा सध्याचा मूड पाहाता सर्व भाजप खासादारांचं टेन्शन देखील वाढलं आहे. आमदारकीसह खासदारकीला देखील नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाऊ शकते. नेत्यांची लोकप्रियता जाणून घेण्यासाठीच जनतेतून तीन नावे मागीतली जात असल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT