Lok Sabha Election
Lok Sabha Election esakal
देश

Lok Sabha Election : जम्मूमध्ये प्रचाराला वेग

सकाळ डिजिटल टीम

जम्मू : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात उधमपूर येथे शांततेत मतदान पार पडल्यानंतर आता सर्वांचे लक्ष जम्मू मतदारसंघाकडे लागले आहे. निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये येथे २६ तारखेला मतदान होणार आहे. खोऱ्यात विशेष अस्तित्व नसलेल्या भाजपने जम्मूमध्ये मात्र जुगलकिशोर शर्मा यांना पुन्हा एकदा मैदानात उतरवले असून त्यांचा सामना ‘इंडिया’ आघाडीचे उमेदवार रामबन भल्ला यांच्याशी होणार आहे.

जम्मू लोकसभा मतदारसंघाअंतर्गत जम्मू, सांबा, रियासी जिल्ह्यांसह राजौरी जिल्ह्याचा काही भाग येतो. जुगलकिशोर शर्मा आणि भल्ला यांच्यासह २२ उमेदवार रिंगणात आहेत. यात बहुजन समाज पक्षाचे जगदीश राज आणि सनातन भारत दलाचे अंकुर शर्मा यांचा समावेश आहे. राजकीय पक्षांनीही जम्मूमधील प्रचारावर लक्ष केंद्रीत केले आहे. अनेक स्थानिक नेते जम्मूमध्येच ठाण मांडून बसले असून कार्यकर्ते घरोघरी जात प्रचार करत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची १६ एप्रिलला येथे सभा झाली होती, तर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनीही मागील महिन्यात येथे रोड शो केला होता. जुगलकिशोर शर्मा हे २०१४ आणि २०१९ ची निवडणूक जिंकली होती. मागील निवडणुकीत त्यांनी भल्ला यांचाच पराभव केला होता. त्यामुळे यंदाही त्याच विजयाची पुनरावृत्ती करत हॅट्‌ट्रिक साधण्याची त्यांना अपेक्षा आहे.

मोदींची विकास कामे, कलम ३७०, दहशतवादावर वचक हे भाजपच्या प्रचाराचे प्रमुख मुद्दे आहेत. तर भल्ला यांना यंदा नॅशनल कॉन्फरन्स व पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाचे पाठबळ आहे. त्यामुळे यंदा आपल्याला नक्की विजय मिळेल, असा भल्ला यांना विश्‍वास आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: Ram Naik: मुंबईतील कुलाबा येथील मतदान केंद्रावर सुरक्षा व्यवस्था वाढवली

Sakal Podcast : लोकसभेच्या पाचव्या टप्प्याचं आज मतदान ते रोहित शर्मा IPL ब्रॉडकास्टरवर भडकला

Loksabha Election : राज्यात आज अखेरचा टप्पा;मुंबई, नाशिकसह देशभरातील ४९ मतदारसंघांत मतदान

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 20 मे 2024

IPL 2024: अखेर साखळी फेरीची सांगता झाली अन् दुसऱ्या क्रमांकाची रस्सीखेच हैदराबादानं जिंकली

SCROLL FOR NEXT