India Alliance Esakal
देश

India Alliance: "Game Not Over Wait" त्या पोस्टमुळं चर्चेला उधाण; NDA सत्ता स्थापन करणार की इंडिया आघाडी पलटवणार?

India Alliance Meeting: देशातील इंडिया आघाडीच्या सोशल मिडीया हँडलवरुन एक पोस्ट करण्यात आली आहे. त्या पोस्टमध्ये "गेम नॉट ओव्ह, वेट", असं लिहण्यात आलं आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

देशभरातील लोकसभा निवडणुकीचे निकाल ४ तारखेला जाहीर झाले. त्यानंतर देशात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. नेत्यांच्या बैठकांचा सपाटा दिल्लीत लागला आहे. सर्व पक्षांच्या भूमिकेकडे देशाचे लक्ष लागले आहे. देशात पुन्हा एकदा एनडीएकडून सत्ता स्थापन करण्यासाठी मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

पंतप्रधान मोदी यांनी काल (बुधवारी) यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन सत्तास्थापन करण्याचा दावा केला आहे. अशातच लवकरच नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. अनेक देशांना या शपथविधीसाठी आमंत्रण दण्यात आलं आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडीकडून देशातल्या पक्षांना खुलं निमंत्रण देण्यात आलं आहे. संविधानावर विश्वास असणाऱ्या पक्षांनी इंडिया आघाडीत सहभागी व्हावं, असं अवाहन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केलं आहे.

या घडामोडींना वेग आला आहेत अशातच, इंडिया आघाडीच्या ट्विटर हँडलवरुन एक ट्वीट करण्यात आलं आहे. त्या ट्वीटमध्ये "गेम नॉट ओव्हर, वेट", असं म्हटलं आहे. पण, विरोधकांच्या इंडिया आघाडीचं अधिकृत ट्विटर हँडल आहे की, नाही याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

सोशल मिडीया एक्स (पुर्वीचे ट्विटर) वरती इंडिया आघाडी नावाने अकाउंट आहे, त्यावरून एक ट्वीट करण्यात आलं आहे. "Game Not Over Wait" असं पोस्टमध्ये लिहण्यात आलं आहे. या ट्वीटची चर्चा सध्या राजकीय वर्तुळातसह देशभरात सुरू आहे. भाजपला सत्ता स्थापन करणार की इंडिया आघाडी नवा डाव पलटवणार? असे अनेक प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup, IND vs USA: वानखेडेचं मैदान मारत भारतीय संघाची मोहिमेला विजयाने सुरुवात! अमेरिकेवर केली मात

Sarpanch Santosh Deshmukh : संतोष देशमुख हत्या प्रकरणात डिजिटल पुराव्यांची प्रत सादर

CM Devendra Fadnavis : राज्याच्या विकासाला नवे बळ; ‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’मध्ये १०,८३१ कोटींचे करार

Indian Railways Fare Cut : रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा! दहा गाड्यांचे तिकीट दर स्वस्त होणार

Police Jumbo Recruitment : पुणे पोलिसांत जम्बो भरती; १६३३ जागांसाठी १.३९ लाख अर्ज; तंत्रज्ञानाचा होणार वापर

SCROLL FOR NEXT