Yogendra Yadav and Prashant Kishor 
देश

Lok Sabha Election: 'ना मी निष्पक्ष, ना प्रशांत किशोर; योगेंद्र यादवांनी स्वत:च केली भविष्यवाणींची पोलखोल

Lok Sabha Election result 2024 prediction: राजकीय तज्ज्ञांकडून निकालाबाबत भविष्यवाणी केली जात आहे. राजकीय तज्ज्ञांमध्ये प्रशांत किशोर आणि योगेंद्र यादव यांचे नाव प्रामुख्याने घेतले जात आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यादिवशी देशाच्या जनतेने कोणाच्या बाजूने कौल दिला हे स्पष्ट होईल. पण, त्याआधी राजकीय तज्ज्ञांकडून निकालाबाबत भविष्यवाणी केली जात आहे. राजकीय तज्ज्ञांमध्ये प्रशांत किशोर आणि योगेंद्र यादव यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते.

प्रशांत किशोर आणि योगेंद्र यादव या दोघांनी भाजपच्या बाजूने कौल दिला असला तरी त्यांच्या भविष्यवाणीमध्ये फरक आहे. योगेंद्र यादव यांनी भाजपच्या २० ते ३० जागा कमी होतील असा अंदाज वर्तवला आहे. ते भाजपला २७२ किंवा त्यापेक्षा कमी जागा मिळतील असं म्हणाले आहेत. दुसरीकडे, प्रशांत किशोर यांनी भाजपच्या जागा २० ने वाढतील असा अंदाज व्यक्त केला आहे.

नेमकं कशाच्या आधारे हा अंदाज वर्तवण्यात आला? तसेच त्यांच्या आणि प्रशांत किशोर यांच्या भविष्यवाणीमध्ये काय फरक आहे असा प्रश्न योगेंद्र यादव यांना एका मुलाखतीत विचारण्यात आला होता. यावर यादव यांनी उत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, 'ना माझ्याकडे एक्झिट पोल आहे ना त्यांच्याकडे. ते निष्पक्ष नाहीत आणि मी पण निष्पक्ष नाही. त्यांच्या आणि माझ्या काही राजकीय समजेच्या मर्यादा आहेत. पण, आम्ही प्रामाणिकपणे मूल्यांकन करण्याचा प्रयत्न करतो.'

माझं आणि त्यांचं मूल्यांकन वेगवेगळं आहे. मला त्यांच्या दोन गोष्टी अमान्य आहेत. मी म्हणतो की भाजपच्या एका भागात जागा वाढतील तर दुसऱ्या भागात कमी होतील. प्रशांत यांना वाटतं की भाजपला १५ ते २० जागा जास्त मिळतील. समजा ५० पेकी ४० जागांवर नुकसान झाले, अन् दुसरीकडे २० जागा वाढल्या, अशा स्थितीतही भाजपच्या २० जागा कमी होताना दिसत आहेत. मग, प्रशांत भाजपच्या २० जागा वाढतील हे कशाच्या आधारे म्हणत आहेत, असा सवाल यादव यांनी केला.

भाजपला २० जागा जास्त मिळतील असं मला बिलकूल वाटत नाही, कारण फक्त कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये पाहिलं तरी भाजपला इथे जास्त जागा मिळणार नाहीत असं चित्र आहे. मला असंही वाटतं की कर्नाटक, महाराष्ट्रपासून बिहारपर्यंत भाजपच्या विरोधात एक सौम्य लाट सुरु आहे, असं यादव म्हणाले.

प्रशांत किशोर स्वत: मान्य करतात की, पंतप्रधान मोदी यांचा आता जास्त प्रभाव राहिला नाही. राम मंदिराचा मुद्दा देखील आता फारसा प्रभावी दिसत नाही. मग ते कशाच्या आधारे म्हणत आहेत की भाजपच्या जागा कमी होणार नाहीत, उलट वाढतील. म्हणूनच मी त्यांच्या भविष्यवाणीबाबत असहमत आहे, असं ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Koyna Dam Water Level : ...अखेर दिलासादायक बातमी! तळ गाठणारे कोयना धरण पुन्हा भरणार; महाबळेश्वर-नवजातील पावसाने पाणीसाठ्यात मोठी वाढ, पाहा ताजी आकडेवारी

अभिनेत्रीसोबत भररस्त्यात गैरवर्तन; बहिणीसमोरच अनोळखी व्यक्तीचं लाजिरवाणं कृत्य, अभिनेत्रीने सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळी वाजवा आंदोलन

T20 Series : वैभव सूर्यवंशीचं आज पदार्पण? कुणाला बाहेर बसवणार? इंग्लंडविरुद्ध पहिला टी२० सामना, भारताची परीक्षा

Mumbai Local: माकडाच्या हट्टापुढे रेल्वेही थांबली! बोरिवलीत रेल्वे वाहतूक विस्कळीत

SCROLL FOR NEXT