CPI esakal
देश

CPM : संगणकाला विरोध करणाऱ्या 'माकप'ने AI च्या माध्यमातून प्रचाराला केली सुरुवात; असा झाला टोकाचा बदल...

एकेकाळी पश्चिम बंगालमध्ये कामाच्या ठिकाणी संगणकाच्या वापराला विरोध करणारा माकप आता लोकसभा निवडणुकीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करत आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या बाबतीत पक्षात हा टोकाचा बदल झाला आहे.

सकाळ वृत्तसेवा

कोलकताः एकेकाळी पश्चिम बंगालमध्ये कामाच्या ठिकाणी संगणकाच्या वापराला विरोध करणारा माकप आता लोकसभा निवडणुकीसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करत आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या बाबतीत पक्षात हा टोकाचा बदल झाला आहे.

माकप नेते सामिक लाहिरी यांनी ‘पीटीआय’शी बोलताना सांगितले, की पक्षाने प्रचारमोहिमेशी संबंधित बातम्या आणि लोकांच्या हिताच्या तसेच इतर बाबी प्रसारित करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘समता’ या पात्राची निर्मिती केली आहे.

लोकांचे म्हणणे मांडण्यासाठी आम्ही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत आहोत. पश्चिम बंगालमध्ये माकपच्या सोशल मीडिया हँडल्सचे समता सादरकर्ता असून बंगाली भाषेनंतर लवकरच ते हिंदी आणि इंग्रजीमध्येही उपलब्ध होईल, असेही माकपच्या मध्यवर्ती समितीचे सदस्य असलेल्या लाहिरी यांनी सांगितले. पक्षाच्या या नवीन प्रकल्पावर ते काम करत आहेत.

साधारणत: १९८० च्या उत्तरार्धात आणि १९९० च्या पूर्वार्धात दशकात भारतात कामाच्या ठिकाणी संगणकीकरण होऊ लागले असताना माकप आधुनिकतेच्या विरोधात असल्याचा आरोप पक्षाच्या राजकीय विरोधकांकडून करण्यात आला होता. मात्र, माकपविरुद्ध आखलेली ही दुर्भावनापूर्ण मोहीम होती. माकपने कधीही संगणकीकरणाला विरोध केलेला नाही, असेही लाहिरी यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT