Gas Cylinder Price esakal
देश

Gas Cylinder Price : मध्य प्रदेशात गॅस सिलिंडर 450 रुपयांना मिळणार; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

संतोष कानडे

नवी दिल्लीः केंद्र सरकारने घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये २०० रुपयांची घट करुन सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. आता मध्य प्रदेश सरकार गॅसच्या किंमती ४५० रुपये करण्याच्या तयारीत आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहाण यांनी याबाबत घोषणा केली.

मध्य प्रदेशातल्या खरगोनमध्ये जनआशीर्वाद यात्रा काढण्यात आलेली होती. या यात्रेला संबोधित करताना मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहाण यांनी मोठी घोषणा केली. ते म्हणाले की, आता फक्त उज्ज्वला योजनेसाठी नाही तर सरसकट गॅस सिलिंडर साडेचारशे रुपयांना मिळेल. त्यासाठी कार्यवाही सुरु असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

शनिवारी भाजपची जनआशीर्वाद यात्रा बारव विधानसभेतल्या सनावदमध्ये दाखल झाली. या यात्रेसाठी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहाण यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय, खरगोनचे खासादर गजेंद्रसिंह पटेल, खंडवाचे खासदार ज्ञानेश्वर पाटील, बरवाहचे आमदा सचिन बिर्ला या नेत्यांचीही उपस्थित होती.

या यात्रेला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी राज्य आणि केंद्राच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी जनतेला आश्वासनं दिलं. ६० टक्के गुण घेणाऱ्या मुलांना लॅपटॉप आणि प्रत्येक शाळेतील तीन मुलांना स्कूटी देण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला. 'आज तक'ने हे वृत्त दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal Century: जैस्वालची सुरुवात अन् शेवटही शतकाने! इंग्लंडच्या गोलंदाजांना चोपत मोठ्या विक्रमालाही घातली गवसणी

Jaykumar Gore : पृथ्वीराज चव्हाण हे कऱ्हाडचे नेते नसुन देशाचे नेते आहेत, त्यांनी केलेल वक्तव्य हे त्यांना उशीरा सुचलेले शहानपण

ENG vs IND: 'बुमराह असो वा नसो, आमचं काम...', प्रसिद्ध कृष्णा जस्सीच्या न खेळण्यावर नेमकं काय म्हणाला?

Latest Maharashtra News Updates Live: इगतपुरी शहरात शनिवारी दुपारी पोलीसांचा रुट मार्च

Mumbai Traffic: मुंबईतील वाहतुकीत बदल, 'या' मार्गावर महिनाभर नो एन्ट्री; काय असतील पर्यायी मार्ग?

SCROLL FOR NEXT