RSS
RSS esakal
देश

RSS कार्यालय बॉम्बने उडवण्याची धमकी, वादाला फोडणी!

सकाळ डिजिटल टीम

आरएसएसच्या लखनऊ समवेत इतर सहा कार्यालयांना बॉम्बने उडविण्याची धमकी विदेशी नंबरवरुन देण्यात आलीय. उत्तर प्रदेश राज्यातील लखनऊच्या अलीगंज येथे असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऑफीसला बॉम्बने उडविण्याची धमकी मिळताच सगळीकडे गोंधळ उडालाय. ( RSS threat to blow up their offices)

हे सगळे मेसेज अलीगंज येथे राहणाऱ्या नीळकंठ मणी पुजारींना पाठविले गेलेत . मेसेजमध्ये लखनऊ ,नवाबजंग व्यतिरिक्त कर्नाटकच्या चार ठिकाणांविषयी देखील ही धमकी देण्यात आली.

अलीगंज येथे राहणाऱ्या डॉ नीलकंठ पुजारींना व्हाट्सअॅप वर हे मेसेज पाठविण्यात आले. यानंतर डॉ नीळकंठ पुजारींनी मडिगाव पोलिस स्टेशन येथे तक्रार दिली असून गुन्हा नोंदविण्यात आलाय. सायबर क्राईम ब्रांच याविषयी अधिकचा तपास करत आहे.

डॉ नीळकंठ पुजारी हे सुलतानपूर येथील एका महाविद्यालयात प्रोफेसर आहेत. ते अलीगंज येथील RSS बरोबर देखील जोडले गेलेले आहेत. तसेच आरएसएसचे जुने स्वयंसेवक आहेत. त्यांना हिंदी , इंग्लिश आणि कन्नड भाषेत हे धमकीचे मेसेज मिळालेत. या मेसेजमध्ये आरएसएसच्या उत्तरप्रदेश सहीत कर्नाटकच्या सहा ठिकाणांना रविवारी रात्री आठ वाजता बॉम्बने उडविण्याची धमकी देण्यात आली. या संदर्भातील माहीती उच्च अधिकारी आणि सुरक्षा एजन्सींना देखील देण्यात आलीय. कोणीतरी त्रास देण्यासाठीच ही धमकी दिल्याचं म्हंटलं जातंय,चौकशीनंतरच यासंदर्भातली माहीती पुढे येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BANW vs INDW, T20I: भारतीय महिलांचा सलग दुसरा विजय, राधा यादव-दीप्ती शर्माची धारदार गोलंदाजी

Fact Check : निवणुकीत लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये डुकराची चरबी नसते; व्हायरल होत असलेला दावा खोटा

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौसमोर मुंबईनं नांगी टाकली; 5 षटकात 4 फलंदाज तंबूत

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

SCROLL FOR NEXT