electricity esakal
देश

MP : ग्राहकाला आले तब्बल 3, 419 कोटी रुपयांचे वीजबील, रक्कम पाहिल्यावर थेट रुग्णालयात दाखल

अवाढव्य किंमत ऐकल्याने गुप्ता यांना धक्का बसला असून त्यांचे सासरे आजारी पडले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

अवाढव्य किंमत ऐकल्याने गुप्ता यांना धक्का बसला असून त्यांचे सासरे आजारी पडले आहेत

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथील वीजबील कंपनीकडून एक अजब घटना घडली आहे. येथे राहणाऱ्या प्रियंका गुप्ता यांना तब्बल 3, 419 कोटी रुपयांचे वीज बिल आले आहे. वीज बिलाची ही अवाढव्य किंमत ऐकल्याने गुप्ता यांना धक्का बसला असून त्यांचे सासरे आजारी पडले आहेत. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, मध्य प्रदेश सरकारकडून चालवल्या जाणार्‍या वीज कंपनींवर नागरिकांनी 'मानवी त्रुटी' म्हणून ठपका ठेवला आहे. त्यानंतर शहरातील शिव विहार कॉलनीत राहणाऱ्या गुप्ता कुटुंबाला १३०० रुपयांचे योग्य ते बिल देत दिलासा दिला आहे. वीज बिल कंपनींच्या या व्यवहारामुळे नागरिक संतापले आहेत. वीज कंपनींच्या हलगर्जीपणामुळे एखाद्या जीव जाऊ शकतो, अशी तीव्र प्रतिक्रिया नागरिकांतून येत आहेत.

काय आहे नेमकी घटना ?

गुप्ता यांचे पती संजीव कांकणे यांनी सांगितले की, जुलै महिन्याच्या वीज बिलातील घरगुती वापराची रक्कम पाहून वडील आजारी पडले आहेत. ठराविक रकमेत येणारे बील अचानक कोटी रुपयांत अल्याने सर्वांना धक्का बसला आहे. 20 जुलै रोजी दिलेले वीज बिल मध्यप्रदेशातील विद्युत वितरण कंपनीच्या पोर्टलद्वारे क्रॉस व्हेरिफाय केले होते. त्या वीज बिलाची किंमत योग्य होती. नंतर राज्य वीज कंपनीने ते बिल दुरुस्त केल्यानंतर त्याची किंमत वाढलेली आली.

या प्रकरणी वीज कंपनीचे महाव्यवस्थापक नितीन मांगलिक यांनी, अवाढव्य वीज बील वाढवण्यावरून मानवी चुकांचा ठपका ठेवत संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. ते म्हणाले, एखाद्या कर्मचार्‍याने वापरलेल्या युनिट्सऐवजी सॉफ्टवेअरमध्ये ग्राहक क्रमांक प्रविष्ट केला की जास्त रकमेचे बिल येण्याची शक्यता असते.

त्यामुळे वीज ग्राहक गुप्ता यांना योग्य ते 1,300 रुपयांचे योग्य बिल देण्यात आले आहे. या घटनेत वीज बिलातील झालेली त्रुटी सुधारण्यात आली असून संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येत आहे, अशी माहिती खासदार उर्जा मंत्री प्रद्युम्न सिंह तोमर यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Dare Village : गावी आलो किंवा लंडनला गेलो तरी पोटदुखी, “ विरोधकांना कामातून उत्तर देईन”,एकनाथ शिंदेंनी दरेतून साधला निशाणा

रोहित शर्माचा Mumbai Indians मधील 'सहकारी' Ajit Agarkar ची जागा घेणार; आता हिटमॅन २०२७ चा वर्ल्ड कप खेळणारच...

सगळं सोडून द्यायचा विचार होता पण...; सुटकेनंतर संतोष पंडित काय म्हणाले? तुरुंगातल्या व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह

Marathi News Live Updates : UPI व्यवहारांवर शुल्क, व्यापाऱ्यांकडून QR कोड हटवण्याची भूमिका

Panvel News: पनवेलमध्ये वाहतुकीत मोठे बदल! गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांसाठी प्रशासनाचे कडक पाऊल

SCROLL FOR NEXT