Ramayan 
देश

रामायणावरील क्विझ जिंका आणि अयोध्येचा हवाई दौरा करा

सकाळ डिजिटल टीम

भोपाळ: मध्य प्रदेश सरकार आपल्या वेगवेगळ्या निर्णयांबद्दल कायम चर्चेत असते. गेल्या काही दिवसांपूर्वीच मध्य प्रदेश सरकारने बैलांच्या नसबंदीचा शासकीय आदेश काढला होता. त्यावर वाद झाल्यानंतर तो तातडीने मागे घेण्यात आला होता. त्यानंतर आता आणखी एक उपक्रम मध्य प्रदेश सरकार राबवणार आहे, ज्याची सध्या चर्चा सुरु आहे. मध्य प्रदेश सरकार आता रामायणावर आधारित सामान्य ज्ञानाची स्पर्धा आयोजित करणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना उत्तर प्रदेशातील अयोध्येला जाण्याची टूर करायला मिळणार आहे. विजेत्यांना ही टूर विमान प्रवासाद्वारे करता येणार आहे. सध्या अयोध्येमध्ये भगवान श्रीरामांच्या भव्य राम मंदिरांचं बांधकाम सुरु आहे.

मध्य प्रदेशच्या पर्यटन तसेच संस्कृती मंत्री उषा ठाकूर यांनी काल रविवारी जारी केलेल्या एका अधिकृत वक्तव्यात म्हटलंय की, रामायणावर आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील सामान्य ज्ञानाची एक स्पर्धा आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना विमानाद्वारे अयोध्याची सफर घडवून आणली जाणार आहे.

ठाकूर यांनी रविवारी इंदौर जिल्ह्यातील महूमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विज्ञान विश्वविद्यालयातील प्रस्फुटन कार्यक्रमामध्ये सामान्य ज्ञानाच्या स्पर्धेचं उद्घाटन करताना म्हटलंय की, संस्कृती विभागाद्वारे रामायणातील अयोध्या कांडावर आधारित सामान्य ज्ञान स्पर्धा आयोजित केली जाईल. प्रत्येक जिल्ह्यातील आठ लोकांना निवडण्यात येईल. यामध्ये चार विद्यार्थी आणि चार सामान्य लोक यांचा समावेश असेल.

बैलांच्या नसबंदीचा आदेश

गेल्या काही दिवसांपूर्वी मध्यप्रदेशमध्ये बैलांच्या नसबंदीचा आदेश निघाला होता आणि एकच हलकल्लोळ माजला होता. हा नसबंदीचा आदेश निघाल्याच्या दुसऱ्याच दिवशी मागे घेण्यात आला आहे. कारण या आदेशावरुन इतका गोंधळ झालेला पहायला मिळाला की, राज्य पशुपालन विभागाला हा आदेश मागे घ्यावा लागला आहे. या आदेशाविरोधात सर्वांत आधी भाजपच्याच खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर पुढे आल्या होत्या..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs RCB WPL 2026 : जॅकलिनचा डान्स, हनी सिंगचा धमाका; हवा केली ‘त्या’ तरुणीने! कोण आहे Harnaaz Kaur Sandhu?

Municipal Election: भिवंडीचे राजकारण अडकलं बिगर-मराठी मतदारांच्या कौलात; शेवटच्या क्षणीही सस्पेन्स कायम!

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये ठाकरे बंधुंची संयुक्त सभा सुरू

Stray Dogs Issue: शिक्षकांना भटके कुत्रे पकडण्याचे आदेश; शिक्षण विभागाचे अजब फर्मान, सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

Municipal Election 2026 : अमरावतीत प्रचाराला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न? अनिल बोंडेंच्या 'त्या' दाव्यानं राजकारण तापलं, संजय खोडकेंचंही प्रत्युत्तर...

SCROLL FOR NEXT