crime news  
देश

Viral Video : तलाठ्याने घेतली पाच हजारांची लाच; समोर पोलिस दिसताच रक्कम गिळून टाकली

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातील कटनी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तलाठ्याने एका व्यक्तीकडून लाच म्हणून पाच हजार रुपये घेतले. मात्र आपल्याला लाच घेताना पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचल्याचे समजताच, तलाठ्याने लाचेचे पैसे गिळंकृत केले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

दरम्यान पोलिसांनी या घटनेनंतर आरोपी तलाठ्याला जवळच्या रुग्णालयात नेले. यावेळी डॉक्टरांनी त्याने गिळलेली रक्कम बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. या घटनेची व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

एसपीई एसपी संजय साहू यांनी दिलेल्या माहितीनुसार तलाठी गजेंद्र सिंह याने त्यांच्या खासगी कार्यालयात पाच हजार रुपयांची लाच घेतली. परंतु लाच घेतल्यानंतर त्यांना लोकायुक्त विशेष पोलीस आस्थापनेने (एसपीई) सपाळा रचल्याचे लक्षात आले. हा प्रकार लक्षात येताच तलाठी गजेंद्र याने लाचेची सर्व रक्कम खावून टाकली.

एसपी संजय साहू यांनी सांगितले की, बारखेडा गावातील एका व्यक्तीने त्यांच्याकडे तक्रार केली होती, की तलाठ्याने आपल्याला लाच मागितली. यानंतर तलाठ्य़ाकडे ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने पैसे दिले. मात्र आरोपी तलाठ्याला संशय आला. त्याचवेळी समोर पोलीस पथक दिसले. त्यावेळी आरोपीने पैसे गिळंकृत केले. सध्या पोलिसांनी आरोपी तलाठ्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याच्या मालमेचा तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

Food Adulteration Crackdown: अन्न भेसळ पथकाच्या धास्तीने टाकळी राजेरायमध्ये सर्व दुकाने बंद; गुटखा व भेसळयुक्त सुट्या तेलाच्या खुलेआम विक्रीचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT