Babasaheb Ambedkar  Sakal
देश

High Court: "स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही आपण आंबेडकर जयंती व धार्मिक सण एकत्र साजरे करू शकत नाही?"

"एकावेळी साजरे करू शकत नसू तर आपल्या देशाबद्दल लोक काय विचार करतील?"

वैष्णवी कारंजकर

मद्रास उच्च न्यायालयाने गुरुवारी सांगितलं की, स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर, देशातील नागरिकांना आंबेडकर जयंती आणि इतर कोणतेही स्थानिक धार्मिक सण एकाच वेळी साजरे करता आले पाहिजेत.

प्रभारी मुख्य न्यायमूर्ती टी राजा आणि न्यायमूर्ती डी भरत चक्रवर्ती यांच्या खंडपीठाने नागापट्टिनम जिल्ह्यात १४ एप्रिल रोजी या भागातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या समस्येची भीती दाखवून प्रतिबंधात्मक आदेशाची मागणी करणारी याचिका फेटाळताना हे निरीक्षण नोंदवलं आहे.

स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षांनंतरही आपण आंबेडकरांची जयंती एकाच वेळी गावात मंदिरात उत्सव सुरू असताना साजरी करू शकत नाही, तर लोक आपल्या देशाबद्दल काय विचार करतील?, असं म्हणत न्यायालयाने याचिका फेटाळली.

याचिकाकर्त्याने न्यायालयाला सांगितलं की पट्टावर्ती गावातील अनुसूचित जाती समुदायाने नागपट्टिनम येथील स्थानिक बसस्थानकावर आंबेडकरांच्या प्रतिमेला आदरांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.त्याच दिवशी गावात मंदिर उत्सव साजरा केला जात होता. त्यावेळी त्या दोघांमध्ये संघर्ष झाला होता.

शुक्रवारी आंबेडकर जयंतीनिमित्त असाच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असं ते म्हणाले. अशाप्रकारे, त्यांनी प्रार्थना केली की या परिसरात कोणत्याही मोठ्या मेळाव्यास मनाई करण्याचे निर्देश जिल्हा अधिकाऱ्यांना देण्यात यावे. मात्र, पोलीस पुरेशी सुरक्षा व्यवस्था करण्यासाठी सज्ज असल्याचं सांगत न्यायालयाने याचिका फेटाळून लावली. दोन्ही कार्यक्रम शांततेत पार पडावेत यासाठी स्थानिक पोलिसांना तोंडी निर्देश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fight Between Two Pilots: विमानात 174 प्रवासी अन् दोन पायलटचे भांडणे, हाणामारी... नंतर थेट हायजॅकचा अलर्ट; इस्राईल सरकारमध्ये खळबळ!

Ambegaon Crop Insurance: पावसाने दगा दिला तर आधार मिळणार; आंबेगावातील ६,८६३ शेतकऱ्यांनी घेतले पीकविम्याचे कवच

Purna River Crisis: कोल्हापुरी बंधाऱ्याची दुरुस्ती रखडल्याने पूर्णा नदीचे पाणी वाहून गेले

Earthquake: भूकंपाचे धक्के किल्लारीत; माहिती दिल्लीहून!घटनेला ३३ वर्षे होऊनही स्थानिक संशोधनाचा अभाव

Raju Shetti: ‘नोव्हेंबरपूर्वी एकही साखर कारखाना सुरू करू देणार नाही’; राजू शेट्टींचा इशारा, ‘रोक सको तो रोक लो’

SCROLL FOR NEXT