Marathi News Live Update
Marathi News Live Update 
देश

देशात अन् राज्यात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

सकाळ डिजिटल टीम

खासदार अभिषेक बॅनर्जी यांना ईडीचे समन्स

शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांना १३ जून रोजी समन्स बजावले आहे.

परराष्ट्र मंत्र्यांनी घेतली टिळक विहार भागातील दंगलीतील पीडितांची भेट

दिल्ली: परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी टिळक विहार भागातील शीखविरोधी दंगलीतील पीडितांची भेट घेतली.

बारामती, दौंड भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस 

आरोपी मनोज सानेला 16 जूनपर्यंत पोलीस कोठडी

मीरा-भाईंदर न्यायालयाने आरोपी मनोज सानेला 16 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या 32 वर्षीय लिव्ह-इन पार्टनरची कथितपणे हत्या केल्यानंतर त्याला काल रात्री अटक करण्यात आली होती.

शिंदे भाजप सरकार दंगली घडवत आहेत- संजय राऊत

संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर घणाघात टिका केलीय. सरकारला निवडणूकीसाठी औरंगजेबाची गरज पडत असल्याचा गंभीर आरोप राऊत यांनी औरंगाबाद येथे बोलताना केला आहे. औरंगाबादमधील पहिल्या शाखेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात संजय राऊत बोलत आहेत.

कोल्हापुरातील घटना ही शासन आणि गृहखात्याची जबाबदारी- शाहू छत्रपती महाराज

घटनेचा सखोल तपास झाला पाहिजे. अशा घटना घडू नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. सर्व जबाबदारी शासनाची आणि गृहखात्याची असते. पुन्हा अशा घटना घडू नये यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आधी छत्रपती संभाजी नगर, अहिल्यानगर आणि आता कोल्हापूरमध्ये ही घडलं आहे. याच्यात काही जुळलेले धागे आहेत का हे तपासावे.

समीर वानखेडेंना उच्च न्यायालयाचा दिलासा

समीर वानखेडेंना हायकोर्टाचा दिलासा पुढील दोन आठवडे कायम आहे. याचिकेत सुधारणा करण्याची मुभा कोर्टाने दिली आहे. 23 जूनला दुपारी 2:30 वाजता याबाबत सुनावणी होणार आहे. तपास प्राथमिक अवस्थेत असल्याने वानखेडेंना दिलेला अटकेपासूनचा दिलासा रद्द करण्याची मागणी सीबीआयची केली होती.

मान्सून केरळात दाखल, भारतीय हवामान खात्याची अधिकृत घोषणा

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदाचा मान्सून केरळात दाखल झाला आहे. भारतीय हवामान खात्याने यासंबधीची अधिकृत घोषणा केली आहे.

कोल्हापुरात शांतता राखण्यासाठी जनतेने पोलीसांना साथ द्यावी - शरद पवार

कोल्हापुरात शांतता राखण्यासाठी जनतेने पोलीसांना साथ द्यावी, कोल्हापूर नगर येथील घडणाऱ्या या घटना राज्याच्या लौकिकाला शोभा देणाऱ्या नाहीत. अशा घटना दुर्दैवी आहेत. राज्यात जाणीवपूर्वक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचंही शरद पवार म्हणाले आहेत .

मनसे नेते संदीप देशपांडे आणि इतर 8 जणांविरुद्ध FIR दाखल

मनसे नेते संदीप देशपांडे आणि इतर 8 जणांविरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम 37, 135 अन्वये कोल्हापुरात झालेल्या निदर्शनेनंतर औरंगजेबाच्या पुतळ्याचे दहन केल्याबद्दल एफआयआर दाखल करण्यात आलं आहे. याबाबतची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.

RBI चा कर्जदारांना दिलासा! रेपो रेट 'जैसे थे'

भारतीय अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत असून महागाई दरात घट झाली असल्याची माहिती आरबीआयचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली आहे.आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केला नसून रेपो रेट 6.50 टक्क्यांवर कायम राहणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे व्याजदर जैसे थे राहणार आहेत.

Marathi News Live Update: RBI चा कर्जदारांना दिलासा! रेपो रेट 'जैसे थे'लिव्ह-इन पार्टनरची हत्या, मृतदेहाचे तुकडे मिक्सरमध्ये केले बारिक, मुंबईतील घटना

दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाने देश हादरला. ही घटना ताजी असतानाच अशीच एक घटना मुंबईत घडली आहे. मुंबईतील मिरा रोडमध्ये लिव इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या आपल्या रुम पार्टनरची निघृण हत्या करुन तिच्या शरीराचे तुकडे तुकडे करुन विल्हेवाट लावण्याची घटना समोर आली आहे.

'मी लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन', राहुल नार्वेकरांचं वक्तव्य

राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालानंतर आमदार निलंबनाचा निर्णय आता विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आला आहे. त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष १६ आमदारांच्या अपात्रतेवर काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागलं असतानाच त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. मी लवकरच क्रांतिकारी निर्णय घेईन असं राहुल नार्वेकर यांनी म्हंटलं आहे.

शिंदे-भाजप सरकार दंगली घडवत आहेत- संजय राऊत

शिंदे-भाजप सरकार दंगली घडवत आहेत. हिम्मत असेल तर खऱ्या दंगलखोरांना शोधा. राज्यातील दंगे म्हणजे गृहविभाग खात्याचे अपयश असल्याचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हंटलं आहे.

देशासह राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Samruddhi Accident: समृद्धी महामार्गावरील अपघात कधी थांबणार? कारला मागून धडक दिल्याने तिघांचा मृत्यू

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

SCROLL FOR NEXT