देश

Mahatma Gandhi Death Anniversary : गांधींजींचे 'हे' महत्वाचे विचार आपल्याला जीवनात नेहमीच उपयोगी पडतील

महात्मा गांधींचे हे अनमोल विचार बदलतील तुमचं जीवन...

Aishwarya Musale

आज 30 जानेवारी म्हणजे महात्मा गांधीजींची पुण्यतिथी. 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधी यांची हत्या करण्यात आली. आजच्याच दिवशी नथुराम गोडसेनी गांधींवर गोळ्या झाडल्या होत्या. या घटनेने संपुर्ण देश हादरला होता. त्यामुळे आजचा दिवस कोणताही भारतीय विसरू शकत नाही.

गांधीजींचा जन्म गुजरातमधील पोरबंदर इथं 2 ऑक्टोबर 1869 रोजी झाला. 'माझं जीवन हाच माझा संदेश आहे' असं सांगणाऱ्या महात्मा गांधीजींचे जीवन खरंच एक मोठा संदेश आहे. आजही महात्मा गांधीजींचे विचार लोकांसाठी प्रेरणास्त्रोत आहेत.

आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण त्यांच्या महत्वाच्या दहा विचारांवर एक नजर टाकूयात. 

1. क्षमा करणे ही बलवान व्यक्तीची ओळख आहे. 

2. कोणतेही काम करत असाल तर ते प्रेमाने करा अन्यथा ते करू नका.  

3. जगात बदल घडवायचा असेल तर तो बदल प्रथम स्वत:मध्ये घडवा.

4. दुर्बल व्यक्ती कधीही कोणाला क्षमा करु शकत नाही. क्षमा करणे हा सामर्थ्यवान व्यक्तीचा गुणधर्म आहे. 

5. प्रतिशोध हा असा गुण आहे जो जगाला आंधळा बनवतो. 

6. अगदी सभ्य मार्गानेही तुम्ही जगाला हादरवून सोडू शकता. 

7. थोडासा संयम हा हजारो उपदेशांपेक्षा अधिक मौल्यवान आहे. 

8. मनुष्य हा त्याच्या स्वत:च्या विचारांची निर्मिती आहे. तो कसा विचार करतो त्याचप्रमाणे त्याचं चारित्र्य ठरतं. 

9. आपण शांतता प्रस्थापित करण्यासाठी काय विचार करतो, काय बोलतो आणि काय कृती करतो यावर आपलं समाधान अवलंबून आहे. 

10. भीती हा शरीराचा आजार नाही तर तो आत्म्याला मारतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजार हिरव्या रंगात बंद; Infosys करणार शेअर बायबॅक! जाणून घ्या शेअर बाजारातील अपडेट्स!

ICC ODI Ranking मध्ये मोठा बदल! रोहित शर्माने गमावला अव्वल क्रमांक, 'या' खेळाडूने पटकावलं सिंहासन

Mumbai Local: मुंबई लोकलची सेवा कोलमडली! तांत्रिक बिघाडामुळे अनेक गाड्या खोळंबल्या, प्रवाशांना मनस्ताप

वयाची पन्नाशी गाठली; तरीही अविवाहित का आहे सुष्मिता सेन? स्वतः सांगितलेलं कारण, म्हणाली- माझ्या आयुष्यात...

Latest Marathi Breaking News Live Update : नाशिकच्या सिन्नरमध्ये बसस्थानकात भीषण अपघात

SCROLL FOR NEXT