Rahul Gandhi sakal
देश

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्याची 'ही' याचिका हायकोर्टाने फेटाळली

सुनिता महामुनकर

मुंबई : राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या हत्येबाबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी (rahul gandhi) यांनी केलेले भाषण पुरावा (evidence) म्हणून दाखल करण्याची मागणी करणारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) कार्यकर्त्याची याचिका (Petition) मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai high court) फेटाळली.

आरएसएसचे स्वंयसेवक राजेश कुंटे यांनी उच्च न्यायालयात भिंवडी दंडाधिकारी न्यायालयाच्या निर्णयाविरोधात याचिका केली होती. गांधी यांनी मार्च 2014 मध्ये भिंवडीमधील एका जाहीर सभेत गांधी हत्येबाबत कथित विधान केले आहे. गांधी यांची हत्येमागे आरएसएसचा सहभाग होता, असे कथित विधान गांधी यांनी केले, असा दावा कुंटे यांनी केला आहे. या भाषणाच्या विरोधात कुंटे यांनी दंडाधिकारी न्यायालयात मानहानीचा खटला दाखल केला आहे. गांधी यांच्या भाषणामुळे संघाची प्रतिमा मलीन झाली, त्यामुळे गांधी यांचे भाषणाच्या प्रती पुरावा म्हणून ग्राह्य धरावे, अशी मागणी केली होती. मात्र ही मागणी भिंवडी न्यायालयाने सन 2018 मध्ये नामंजूर केली होती.

याविरोधात कुंटे यांनी उच्च न्यायालयात सन 2019 मध्ये याचिका केली होती. आज न्या रेवती मोहिते-डेरे यांच्या पुढे यावर सुनावणी झाली. न्यायालयाने कुंटे यांची मागणी अमान्य केली आणि याचिका फेटाळली. गांधी यांच्या वतीने याचिकेला विरोध करण्यात आला. याचिका अप्रस्तुत आणि बेकायदेशीरणे मागणी केलेली आहे असा आरोप करण्यात आला. गांधी यांनी त्यांच्यावरील आरोपांचे खंडन केले आहे. माझे भाषण जोडतोड करुन आणि चुकिच्या पध्दतीने वापरले आहे, असा बचाव त्यांनी भिंवडी न्यायालयात केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vegetable Rate Hike : पावसाचे आगमन लांबले; भाजीपाला महागला! आवक ४० टक्क्यांनी घटली; मेथी, भेंडी, पालक, वांगीही तेजीत

Bullet Train: भारतच पुढची बुलेट ट्रेन उभारणार! मुंबईहून पुण्यात अवघ्या ४८ मिनिटांत पोहोचणार; कामाला सुरुवात कधी होणार?

'तो फोनवर घाणेरडं बोलत होता' अमृता खानविलकरने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली...'निनावी नंबरवरून कॉल आला अन्...'

Latest Marathi News Live Update : पिंपरी चिंचवडमध्ये काही भागात पावसाचे आगमन

Amethi Gulgula : केकच्या युगातही कायम आहे अमेठीच्या 'गुलगुला'ची क्रेझ! पाहा साध्या गव्हाच्या पिठापासून कशी बनते ही पारंपरिक मिठाई

SCROLL FOR NEXT