दिवसभर सांदीसपाटीत दडूनदोन मिश्यांच्या अंटिना रोखूनविश्वाचा अदमास घेत बाहेर पडणाऱ्या निशाचर प्रजातीचा सेनापती क्रॉक्रोचिअस यानेमोरीना बेटावरल्या सुग्रास उष्टान्नावरहल्लाबोल केला, तेव्हा बहुधाअमावस्या होती....ऐन अंधाऱ्या अमावस्येलामोरीतील अन्नावर तुटून पडलेल्याकॉक्रोचसेनेवर झाला भडिमार,धुरांचे फवारे, पाण्याचे लोट,एकेका कॉक्रोचसैनिकाचा घासघेणारे विध्वंसकारी छर्रे....तरीही कॉक्रोचिअस हटला नाही,जसे दाविदाने द्यावे आव्हानगोलायथला, आणि गोफणीच्यामाऱ्याने पार आडवा करावा तोगोलार्धाकार गोलायथ,अगदी तस्से घडले!जंतरमंतर झाल्याप्रमाणे दमनकारीराजवटीने दाबले शेपूट पायातल्या पायात,आणि सहापैकी तीन पाय पिझ्झाच्यातुकड्यावर रोवत कॉक्रोचिअसनेठोकली विजयी ललकारी, ‘‘वास्तेगुना हुईया!’’इथेच घडले ते मन्वंतर....कॉक्रेचिअसच्या सेनेचे अगदीचकाही चुकलेले नाही, आपण सारेप्राणीमात्र ही देवाचीच लेकरे असल्यानेभाबड्या, भुकेल्या तिलचट्ट्यांनाहीअन्नाचा अधिकार आहेच, सबबमोरीत उष्ट्यान्नाचे पिंडत्यांच्यासाठी ठेवलेच पाहिजेत,असा भूतदयेने भळभळणारा भावाविष्कारकरुन अनेकांनी केली इन्सानियती नुमाईश.कुणी म्हणाले, ‘‘जाहील बसला सिंहासनावरतर अवामलाही तो जाहीलच करणार! हाडूकचघळणाऱ्याचे मूंह काय बोलणार? आणिसांगणार तरी काय? लानत है!’’.कुणी म्हणाले, ‘‘कॉक्रोचिअस इज माय रिअल हीरो!’’कुणी म्हणाले, ‘‘कॉक्रोचक्रांती चिरायु होवो!’’कुणी म्हणाले, ‘‘दमनकारी झुटलरशाहीनेमारलेल्या लाल-काळ्या हिटचा त्रिवार निषेध!’’कुणी म्हणाले, ‘‘अन्यायग्रस्तांचा आवाज कॉक्रोचिअस,कुणी म्हणाले, ‘‘ऐका हो ऐका!,मानवाच्या भविष्याचे भाकित कॉक्रोचिअस,वर्तमानाचा वानोळा कॉक्रोचिअस,भूतकाळाचे भान कॉक्रोचिअस.’’कुणी म्हणाले, ‘‘हो, हो, हो! वास्तेगुना हुईय्या!’’एणेप्रकारेण कॉक्रोचक्रांतीचा जयजयकार जाहला....काल्पनिक देवादिकांनी त्यांजवरीकाल्पनिक पुष्पवृष्टी करोनकाल्पनिक इंद्राचे डळमळणारेकाल्पनिक आसन तूर्त वाचविले.झारखंडी झुरळांना सध्या शिळ्याडाळभातावर बसवून कॉक्रोचिअसनेकोकाकोलाचा नवा टीन उघडूनसुपर‘हिट’ ओटीटी मालिकेच्यादुसऱ्या सीझनची घोषणा केली....आताशा घरोघरी सुगृहस्थ आणिसुगृहिणी वेळेत स्विगी-सैपाक वगैरेकरून वेळच्यावेळी झांकपांकन करता कॉक्रोचिअसच्या फौजांसाठीरेशनशिधा आदरेकरोन उपलब्ध करितात.जेनझीच्या झगमगाटी झणझणीतशब्दलाघवास टरकून वाडवडीलनम्रतेचे धडे गिरवू लागली....जाहिलांची बोलती बंद होऊनकाळेनिळे हिट स्वतःच मुखावर फवारूनगप्प बसण्याचा राष्ट्रीय कार्यक्रमआखण्यात आला...जाहिलांची झाली झुरळे, आणिझुरळांचे झाले झुंझारराव!...इतुके सारे विद्येपोटी घडले, महाराजा!केशवसुत ते म्हणुनी गेले...हर्षखेद ते मावळलें, हास्य निवालेंअश्रु पळाले; कण्टकशल्यें बोंथटलीं,मखमालीची लव वठली; कांही न दिसे दृष्टीला,प्रकाश गेला, तिमिर हरपला; काय म्हणावें या स्थितिला?झपूर्झा ! गडे झपूर्झा !.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.