Mahua moitra esakal
देश

'आम्ही पाच मारले' या भाजपच्या माजी आमदाराच्या विधानावर महुआ मोईत्रांचा हल्लाबोल

ज्ञानदेव आहुजा यांनी सांगितले की, त्यांनी पहिल्यांदाच एकाची हत्या केली आहे

सकाळ डिजिटल टीम

मॉब लिंचिंगचा एक वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांनी राजस्थानमधील भाजप नेते आणि माजी आमदार ज्ञानदेव आहुजा यांच्यावर हल्लाबोल केला आहे. महुआ यांनी म्हटले आहे की बिलकीस बानो बलात्कार प्रकरणातील 11 दोषींचे स्वागत करणार्‍या पक्षाला गुजरातमधून राजस्थानला पाठवावे जेणेकरून ते या भाजप नेत्यालाही पुष्पहार घालू शकतील.

खरंतर, शनिवारी ज्ञानदेव आहुजाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये त्यांनी उदयपूरमधील कन्हैया लालचा शिरच्छेद केल्याच्या घटनेचा उल्लेख केला आहे. ज्ञानदेव आहुजा यांनी सांगितले की, त्यांनी पहिल्यांदाच एकाची हत्या केली आहे. आतापर्यंत आम्ही पाच जण मारले आहेत. ते म्हणाले मी माझ्या कार्यकर्त्यांना सूट दिली आहे. मारा, निर्दोष सुटका करून देऊ, तसेच जामीनही मिळवून देऊ असंही ते व्हिडिओमध्ये म्हणत आहेत.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महुआ मोइत्राने दोन ट्विट केले आहेत. त्यांनी लिहिले आहे की, मिशी असलेला हा भाजपचा राक्षस पाच जणांना मारल्याचा दावा करत आहे. आत्तापर्यंत आम्ही पाच जण मारले, असे सांगत आहे. वर्षानुवर्षे मारण्याची सूट आम्ही दिली आहे.

यानंतर महुआने आणखी एक ट्विट करत टोमणा मारला की, भाजपने बिल्किस बानों प्रकरणातील दोषींचे स्वागत करणाऱ्या पक्षाला गुजरातमधून राजस्थानला पाठवावे, जेणेकरून ते या भाजप नेत्याचे स्वागत करू शकतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

IND vs WI 2nd ODI: मोहम्मद सिराजला खेळण्याची संधी मिळणार, पण कोणाचा पत्ता कट होणार? पाहा संभावित Playing XI

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: ​सासरी होणाऱ्या मानहानीला अन् छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT