ACCIDENT NEWS
ACCIDENT NEWS 
देश

भीषण अपघात: भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली तलावात उलटली; 27 जणांचा मृत्यू

सकाळ डिजिटल टीम

कानपूर - उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्यात शनिवारी रात्री उशिरा एक मोठा अपघात झाला. या अपघातात 40 भाविकांनी भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली तलावात कोसळली. ट्रॉलीतील सर्व भाविक तलावाच्या पाण्यात बुडाले. अपघातानंतर भाविकांमध्ये एकच खळबळ उडाली. आतापर्यंत 27 जणांचा मृत्यू झाला असून दोन डझनहून अधिक जण जखमी झाले आहेत.

अपघातातील अनेकांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. सहा पोलिस ठाण्यांचा फौजफाटा घटनास्थळी पोहोचला आहे. स्थानिक लोकांच्या मदतीने जखमींना तलावातून बाहेर काढून रुग्णालयात पाठवण्यात येत आहे.

या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत मुख्यमंत्र्यांनी जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

कोर्टा गावात राहणारा राजू निषाद शनिवारी आपल्या एका वर्षाच्या मुलाचे जावळं करण्यासाठी कुटुंबातील 35-40 लोकांसह उन्नाव येथील बक्सर घाट येथील चंद्रिका देवी मंदिरात गेले होते. सर्वजण ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बसले होते. शनिवारी रात्री सर्वजण परतत असताना साध ते गंभीरपूर गावादरम्यान ट्रॅक्टर-ट्रॉली अनियंत्रित होऊन तलावात उलटली. रात्री 9 वाजेपर्यंत पोलिसांनी 22 मृतदेह बाहेर काढले होते. तर रुग्णालयात पाच जणांचा मृत्यू झाला. तलावात अजूनही भाविकांचा शोध सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पूंछमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर, पाकिस्तानशी थेट कनेक्शनची शक्यता

High Court : ''मुस्लिमांना लिव्ह-इन-रिलेशनशीपमध्ये राहण्याचा अधिकार नाही'', हायकोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Pankaja Munde Audio: "पंकजा मुंडेंच्या ऑडिओ क्लीपची चौकशी करा"; बजरंग सोनावणेंची निवडणूक आयोगाकडं मागणी

T20 World Cup 2024: भारतात वर्ल्ड कप सामने पाहाता येणार फ्री! पण कोणाला आणि कसे घ्या जाणून

Latest Marathi News Live Update : गोल्डी ब्रार अन् लॉरेन्स बिस्नोई सिंडिकेटच्या गुन्हेगारी मॉड्यूलच्या विरोधात मोठी कारवाई

SCROLL FOR NEXT