arvind kejriwal and sanjay singh sakal
देश

Arvind Kejriwal: "केजरीवालांविरोधात मोठ्या घातपाताचा कट रचला जातोय"; संजय सिंह यांचा खळबळजनक दावा

संजय सिंह यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ २४ नोव्हेंबरपर्यंत करण्यात आली आहे.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : दिल्ली सरकारनं आणलेल्या अबकारी धोरण घोटाळा आणि कथित मद्य घोटाळा झाल्याच्या आरोपावरुन सध्या दिल्लीच्या आप सरकारमधील मंत्री आणि नेते मंडळी केंद्रीय तपास यंत्रणांच्या टार्गेटवर आहेत.

त्यातच ईडीनं काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यानंतर त्यांच्या अटकेची चर्चा सुरु झाली. यापार्श्वभूमीवर आपचे खासदार संजय सिंह यांनी एक खळबळजनक दावा केला आहे. (Major assassination plot against Kejriwal Sensational claim of AAP MP Sanjay Singh)

केंद्र सरकारवर गंभीर आरोप

मद्य घोटाळाप्रकरणी खासदार संजय सिंह यांना ४ ऑक्टोबर रोजी ईडीनं अटक केली होती. त्यानंतर त्यांची रवानगी सध्या न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. त्यांना आज दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू कोर्टात आणण्यात आलं. यावेळी सुनावणीसाठी नेताना बाजूला उभ्या असलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. (Latest Marathi News)

यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. तसेच अरविंद केजरीवाल यांना अडकवण्याचा डाव आखला जात आहे. त्यामुळं त्यांना केवळ अटकच होणार नाही तर त्यांच्याविरोधात घातपात करण्याचा मोठा डाव आखला जात आहे, असा खळबळजनक आरोपच त्यांनी केला.

संजय सिंह यांच्या कोठडीत वाढ

दरम्यान, आपल्याला कोणी ही माहिती दिली, याबाबत त्यांनी खुलासा केलेला नाही. तसेच केजरीवाल यांच्यासोबत काय घातपात होणार आहे? याचीही माहिती संजय सिंह यांनी दिलेली नाही. दरम्यान, कोर्टानं सुनावणीनंतर संजय सिंह यांच्या न्यायालयीन कोठडीत २४ नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली. (Marathi Tajya Batmya)

आपला केजरीवालांच्या अटकेची शंका

आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना २ नोव्हेंबर रोजी ईडीनं समन्स पाठवलं होतं. हे समन्स बेकायदा असल्याचा दावा केजरीवाल यांनी केला होता तसेच त्यांनी ईडीसमोर हजर राहण्यास नकार दिला होता.

पण अशा प्रकारे समन्स पाठवून चौकशीला बोलावून केजरीवाल यांना अटक करण्यात येईल अशी भीती आपला वाटत आहे. केजरीवालांपूर्वी माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया आणि संजय सिंह यांना मद्य घोटाळा प्रकरणी अटक झाली आहे. सध्या हे दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुण्यात कारमध्ये प्रेमी युगुलाचे अश्लील चाळे, नको त्या अवस्थेत सापडले; तरुणी लहान असल्यानं पोलिसांनी ताकीद देत सोडलं, VIDEO VIRAL

Palghar Fire: गादी कंपनीला भीषण आग, अनेक कामगार होरपळल्याची भीती; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल

Latest Marathi Breaking News Live Update : पुण्यातील मध्यवर्ती भागात असलेल्या रेस्टॉरंट अँड बार मध्ये दरोडा

Aadhar Card Updates : आधारकार्ड मध्ये होणार मोठा बदल! नवीन आधार असणार अधिक सुरक्षित! जाणून घ्या काय होणार बदल

विदर्भातही बिबट्याची दहशत! नागपुरातील भांडेवाडी परिसरात वावर, वनविभागाचं पथक दाखल

SCROLL FOR NEXT