Mallikarjun Kharge sakal
देश

Mallikarjun Kharge : मोदी सरकारच्या उक्ती व कृतीत तफावत - मल्लिकार्जुन खर्गे

मल्लिकार्जुन खर्गे : सभागृहातील वर्तन असंवेदनशील व मनमानीचे

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : ‘‘एकीकडे पंतप्रधान मोदी विरोधकांची तुलना ‘ईस्ट इंडिया कंपनी’शी आणि दहशतवादी संघटनांशी करतात; तर दुसरीकडे गृहमंत्री अमित शहा विरोधकांकडून सहकार्याची अपेक्षा करतात,’’ असे सांगत मोदी सरकारची उक्ती आणि कृती यामध्ये तफावत असल्याचा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी केला.

मणिपूरमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावर संसदेत चर्चा व्हावी यासाठी अमित शहा यांनी खर्गे आणि लोकसभेतील काँग्रेस गटनेते अधीर रंजन चौधरी यांना सहकार्याचे आवाहन करणारे पत्र काल पाठविले होते. त्यावर उत्तर देताना खर्गे यांनी पत्राद्वारे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

गृहमंत्री अमित शहा यांना उद्देशून मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटले, की विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडाकडून सातत्याने पंतप्रधान मोदी यांच्या वक्तव्याची आणि त्यानंतर दोन्ही सभागृहांमध्ये सविस्तर चर्चेची मागणी होत आहे.

पत्रात व्यक्त केलेली भावना पाहता सरकारची उक्ती आणि कृती यात जमीनअस्मानाचा फरक आहे. सरकारचे वर्तन सभागृहात असंवेदनशीलतेचे आणि मनमानी पद्धतीचे आहे. अर्थात सरकारचे हे वर्तन नवे नाही.

नियम परंपरा धाब्यावर बसवून विरोधकांना चाबकाने हाकण्याचा प्रकार सुरू आहे. लहानलहान घटनांना अवाजवी महत्त्व देऊन खासदारांना संपूर्ण अधिवेशासाठी निलंबित करण्यात आले. दररोज नियम २६७ अन्वये चर्चेसाठी विरोधी खासदार नोटीस देतात.

परंतु सत्ताधाऱ्यांकडूनच कामकाजात अडथळे आणले जातात. विरोधी पक्षनेता पीठासीन अधिकाऱ्यांच्या परवानगीने बोलत असताना सभागृह नेते त्यात अडथळे आणतात, अशी जोरदार टीका खर्गे यांनी केली.

ध्वनीक्षेपक बंद करणे हा अपमान : खर्गे

मणिपूरवर संसदेत चर्चा होत नसल्याने वरिष्ठ सभागृह राज्यसभेमध्ये आजही जोरदार गोंधळ झाला. नियम २६७ अन्वये चर्चेसाठी आग्रही विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे यांचा ध्वनीक्षेपक बंद झाल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक झडली. हा आपला अपमान असल्याची संतप्त प्रतिक्रिया खर्गे यांनी व्यक्त केली.

सभागृहात ५० जणांनी नियम २६७ अन्वये नोटीस दिली असल्याने मला बोलण्याची संधी मिळाली नाही. परंतु जेव्हा मी बोलत होतो, तेव्हा ध्वनीक्षेपक बंद करण्यात आला. हा माझा हक्क हिरावण्याचा प्रकार आहे. यातून माझा अपमान झाला असून आत्मसन्मानाला आव्हान देण्यात आले आहे. सरकारच्या सांगण्यानुसार सभागृहाचे कामकाज चालणार असेल तर लोकशाही शिल्लक नाही असेच म्हणावे लागेल, अशी जळजळीत प्रतिक्रिया खर्गे यांनी ट्विटद्वारे व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

‘आमदार-खासदार-कंत्राटदार’ राजकारण सुरू; महाराष्ट्रात दरवर्षी हजारो मुले बेपत्ता... आकडेवारी देत राज ठाकरेंनी सरकारला घेरलं

Maharashtra Kesari: 'महाराष्ट्र केसरी'चा थरारक कुस्ती सामना! महेंद्र गायकवाड, बाळू बोडकेची विजयी सलामी; जमदाडेचं आव्हान संपुष्टात

Raj Thackeray: महाराष्ट्रावर ११ लाख कोटींचं कर्ज.. इराणबद्दल भूमिका अन् इन्स्टाग्राम रील्स; गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंचं मुद्द्यांवर बोट

गॅस सिलिंडर मिळेना, आता ‘या’ कुटुंबांना मिळणार रॉकेल! ग्रामीण भागासाठी निर्णय, सोलापूर जिल्ह्यात साडेचार लाख व्यक्तींची माहिती पाठविली, वाचा...

Unseasonal Rain : चुंगी परिसरात गारपीट आणि दर या दुहेरी संकटाने कांदा उत्पादक हवालदिल

SCROLL FOR NEXT