Mallikarjuna Kharge is in Supreme Court
Mallikarjuna Kharge is in Supreme Court 
देश

मल्लिकार्जुन खर्गे सर्वोच्च न्यायालयात 

पीटीआय

अमृतसर : सीबीआयच्या महासंचालकांना सुटीवर पाठवण्याच्या केंद्राच्या निर्णयाविरोधात कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. सीबीआयचे महासंचालक अलोक वर्मा यांना सुटीवर पाठवण्याचा निर्णय बेकायदा आणि सीबीआय कायद्याच्या विरोधात असल्याचे खर्गे यांनी म्हटले आहे.

सीबीआयच्या कायद्यानुसार महासंचालकाची नियुक्ती करणे किंवा वगळण्याचा अधिकार केवळ विरोधी पक्षनेते, पंतप्रधान आणि सरन्यायाधीश यांच्या तीनसदस्यीय समितीकडे आहे. केंद्रीय दक्षता आयोगाकडे सीबीआयप्रमाणे चौकशीचे अधिकार नसल्याचेही खर्गे यांनी म्हटले आहे.

सीबीआयचे महासंचालक अलोक वर्मा आणि विशेष महासंचालक राकेश अस्थाना या दोघांना सुटीवर पाठवण्यात आले आहे. अलोक वर्मा यांच्या जागी सीबीआयचे सहसंचालक एम. नागेश्‍वर राव यांना हंगामी महासंचालक म्हणून नेमले असून, त्यांनी कार्यभारदेखील हाती घेतला आहे. 

प्रकरण काय 

सीबीआयने आपलेच विशेष महासंचालक राकेश अस्थाना यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. व्यावसायिक सतीश बानू सना यांच्याकडून लाच घेतल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्याचवेळी अस्थाना यांनी पलटवार करत सीबीआयचे महासंचालक अलोक वर्मा यांच्यावर लाचखोरीचा आरोप केला आहे. वरिष्ठ पदावरील अधिकारी एकमेकांवर लाच घेतल्याचे आरोप केल्याचा प्रकार सीबीआयच्या इतिहासात प्रथमच घडला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

SCROLL FOR NEXT