Mamata Banerjee sakal
देश

Mamata Banerjee : ''संदेशखाली प्रकरण हा भाजपचाच कट'', ममता बॅनर्जी यांचा आरोप

सकाळ वृत्तसेवा

कोलकताः ‘‘संदेशखाली प्रकरण हा भाजपनेच रचलेला कट आहे’’ असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी रविवारी केला. तृणमूल काँग्रेसच्यावतीने शनिवारी एक व्हीडिओ प्रसिद्ध करण्यात आला असून त्याआधारे संदेशखाली प्रकरण हे भाजपने रचलेले कटकारस्थान आहे असा आरोप तृणमूलने केला आहे.

‘‘मी आधीपासून हे सांगत आहे की, पश्‍चिम बंगालला बदनाम करण्यासाठी भाजपनेच संदेशखाली प्रकरण रचले आहे. स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून आता हे सिद्ध झाले आहे की, भाजपने अनेक माताभगिनींना चिथावणी देण्याचा प्रयत्न केला असल्याचे यातून सिद्ध झाले असून त्यांचा पश्‍चिम बंगाल विरोधी चेहरा उघडा पडला आहे, असे ममता यांनी ‘एक्स’वरील पोस्ट मध्ये म्हटले आहे. १३ मे रोजी होणाऱ्या मतदानामध्ये या बंगाल विरोधींना सत्तेतून खाली खेचण्यासाठी मतदान करा असे आवाहन ममता यांनी केले आहे.

काय आहे व्हिडिओत?

तृणमूल काँग्रेसच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती संदेशखाली प्रकरण भाजपचे नेते आणि राज्यातील विरोधी पक्षनेते सुवेंदू अधिकारी यांनी घडवून आणल्याचा दावा करत आहे. ही व्यक्ती भाजपचीच पदाधिकारी असल्याचा दावा तृणमूलने केला आहे. मात्र या व्हिडिओच्या सत्यासत्यतेबाबत अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध झालेली नाही. भाजपने मात्र हे सर्व आरोप फेटाळले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood: नेपाळमध्ये पावसाविना पूर! २९१ विदेशी नागरिक बेपत्ता; १०५ भारतीयांचा समावेश, १६ जणांचा मृत्यू

Investment: पोस्ट ऑफिसच्या 15-5-5 फॉर्म्युल्याने बना करोडपती! काय आहे ही गुंतवणूक योजना?

Shalarth ID Scam: शालार्थ आयडी घोटाळा ईडीकडे सोपवावा; शिक्षक परिषदेची मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांकडे मागणी

Lucky Zodiac Signs: “वयाच्या ३० नंतर अचानक बदलतं ‘या’ ५ राशींच्या लोकांचं नशीब; पैसा, करिअर आणि सुख-समृद्धीमध्ये होते मोठी वाढ”

माधुरी दीक्षितने 'कोण होणार करोडपती' होस्ट करायला होकार का दिला? स्वतः सांगितलं खरं कारण; म्हणते- मराठीत...

SCROLL FOR NEXT