Mamata-Banerjee 
देश

ममतांचा केंद्राला झटका; मुख्य सचिवांना निवृत्ती देत दिली नवी जबाबदारी!

केंद्राच्या आदेशानंतरही ममता बॅनर्जींनी मुख्य सचिवांना रिलिव्ह न करता नवी जबाबदारी दिली

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : मोदी सरकार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्यामध्ये कायमच धुसफुस सुरु असते. पुन्हा एकदा असाच प्रकार घडला असून केंद्र सरकारनं ममता बॅनर्जींच्या विश्वासू अधिकाऱ्याला केंद्रात प्रतिनियुक्ती देण्याचा प्रयत्न केला. मात्र, केंद्राच्या या खेळीवर ममतांनी उलट डाव खेळला आणि मुख्य सचिव बंडोपाध्याय (Chief Secretary Bandopadhyay) यांना निवृत्ती देत मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार म्हणून नियुक्ती दिली. त्यामुळे बंडोपाध्याय आता पुढील तीन वर्षे या पदावर कार्यरत असतील. त्याचबरोबर हरिकृष्ण द्विवेदी (Harikrishna Dwivedi) यांना बंगालच्या मुख्य सचिवपदी नियुक्त करण्यात आलं आहे. (Mamata blow to the center New responsibility given to Chief Secretary by retiring)

ममता बॅनर्जी यांनी ट्विटद्वारे आपल्या या निर्णयाची माहिती दिली. त्या म्हणाल्या, "अलपन बंडोपाध्याय यांना नबाना (हावडा येथील पश्चिम बंगाल सरकारचं मुख्यालय) सोडू देणार नाही. बंडोपाध्याय यांच्या बदलीचा आदेश रद्द करण्यासाठी केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींना आपण पत्र लिहिलं होतं. यावर केंद्राचं आपल्याला उत्तरंही मिळालं आहे" केंद्रानं बंडोपाध्याय यांना मंगळवारी दिल्लीतील नॉर्थ ब्लॉक येथे हजेर होत कार्यभार स्विकारण्याचे आदेश दिले होते.

ममतांच्या आग्रहाखातर केंद्रानं केला होता तीन महिन्यांचा सेवाविस्तार

कोरोनाच्या महामारीच्या काळात नुकतंच ममता सरकारच्या आग्रहाखातर बंडोपाध्याय यांना केंद्रानं तीन महिन्यांचा सेवाविस्तार दिला होता. तसंही ते 31 मे रोजी निवृत्त होणार होते. त्यामुळं ममतांनी केंद्राकडे बंडोपाध्याय यांना केंद्रीय सेवेत नियुक्तीचा आदेश रद्द करण्याची विनंती केली होती. तसेच बंडोपाध्याय यांना राज्य सरकार सोडणार नसल्याचंही म्हटलं होतं.

बंडोपाध्याय ममता बॅनर्जींचे विश्वासू अधिकारी

अलपन बंडोपाध्याय 1987 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. ते ममता बॅनर्जींना कायमच 'मॅडम सीएम' असं संबोधत आले आहेत. तसेच बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांचं आगमन होताच ते खुर्चीतून उठून उभं राहत त्यांना आदर देतात. ममता बॅनर्जी यांनी यावर अनेकदा त्यांना टोकलं देखील आहे. बंडोपाध्याय हे नियमांचं काटेकोर पालन करणारे अधिकारी असून त्यांच्या प्रशासकीय अनुभवाला ममता दाद देतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidhan Bhavan Clash: वाद नेत्यांमध्ये, पण भिडले कट्टर कार्यकर्ते! पडळकरांचा मारहाण करणारा आणि आव्हाडांचा मारहाण झालेला कार्यकर्ता कोण?

Uddhav Thackeray targets Devendra Fadnavis: ‘’...तर आणि तरच तुम्ही या राज्याचे पालक, मुख्यमंत्री म्हणून जनतेला तोंड दाखवायच्या पात्रतेचे आहात’’ ; उद्धव ठाकरे कडाडले!

ENG vs IND : रिषभ पंतकडून प्रेरणा घेत भारताच्या महिला क्रिकेटरनेही एकाहाताने मारला 'सुपर सिक्स', Video Viral

Gopichand Padalkar: गोपीचंद पडळकरांनी व्यक्त केली दिलगिरी; बावनकुळेंच्या भेटीनंतर दिली प्रतिक्रिया

Devendra Fadnavis Reaction: विधानभवनातील राड्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले....

SCROLL FOR NEXT