Mamata Banerjee_PM Modi 
देश

काँग्रेस-भाजपच्या संघर्षात ममता बॅनर्जींनी घेतली PM मोदींची भेट!

पार्थ चॅटर्जींच्या शिक्षक भरती घोटाळ्यामुळं ममता बॅनर्जींचं सरकार बदनाम झालं आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशभरात सध्या काँग्रेस विरुद्ध भाजप अस संघर्षाचं वातावरण आहे. महागाई आणि ईडी कारवाईच्या मुद्द्यावर काँग्रेसनं आज देशव्यापी आंदोलन केलं. यामध्ये प्रत्यक्ष राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या देखील रस्त्यावर उतरल्या होत्या. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी या सध्या चार दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असून आज त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. (Mamata Banerjee meets PM Narendra Modi during Congress BJP conflict)

शुक्रवारी संध्याकाळी पावणे पाच वाजण्याच्या सुमारास त्या पंतप्रधानांच्या निवासस्थानी पोहोचल्या. त्यानंतर साधारण अर्धा तास पंतप्रधान मोदी आणि ममता बॅनर्जी यांच्यामध्ये भेट झाली. त्यानंतर त्या आपल्या पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाल्या. पण या भेटीदरम्यान त्यांच्यामध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याचा तपशील मात्र अद्याप समोर आलेला नाही.

संसदेच्या अधिवेशनादरम्यान आपल्या खासदारांना मार्गदर्शन करण्यासाठी तसेच विविध मुद्द्यांवर चर्चेसाठी ममता बॅनर्जी या दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत. त्यातच ममतांच्या मंत्रिमंडळातील निलंबित शिक्षण मंत्री पार्थ चॅटर्जी आणि त्यांच्या सहकारी अर्पिता मुखर्जी यांच्या निवासस्थानी कोट्यवधींच्या रोख रक्कमा आणि सोनं आढळून आल्यानं या मोठ्या भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर ममतांचं सरकार बदनाम झालं आहे. याबाबतही मोदींसोबत त्यांनी चर्चा केली असावी असा अंदाज बांधला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Election : आदेश आला ! जिल्हा परिषद-पंचायत समितीचा धुरळा उडणार, आचारसंहिता दोन दिवसात शक्य, निवडणूक आयोगाकडून जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Latest Marathi News Live Update : मराठी माणसासाठी शेवटची निवडणूक, मुंबईसाठी एक व्हा; राज ठाकरेंचं आवाहन

Bigg Boss Marathi 6 Live Update: कंटेंट क्रिएटर करण सोनवणेची 'बिग बॉस मराठी६' च्या घरात एंट्री

Pune Crime : शेअर बाजाराच्या नावाने अडीच कोटींचा डल्ला! ट्रेडज इन्व्हेस्टमेंटच्या संचालकांना हैदराबाद विमानतळावर बेड्या

अभिनयाचा पडदा ते राजकारणाचं मैदान गाजवणारी दीपाली सय्यदची बिग बॉसमध्ये एंट्री !

SCROLL FOR NEXT