mamata banerjees criticize PM modi says spent 1500 crore rupees on fuel subsidy  
देश

इंधन दरवाढीवरून ठाकरेंनंतर ममता बॅनर्जींचे मोदींना उत्तर, म्हणाल्या...

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यांनंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर इंधन दरवाढीवरून निशाणा साधला. त्यांनी बुधवारी राज्य सरकारांना इंधनाच्या किमतींवरील व्हॅट कमी करण्यास सांगितल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बुधवारी सांगितले की, पश्चिम बंगाल सरकारने गेल्या तीन वर्षांत राज्यातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींवर सबसिडी देण्यासाठी 1,500 कोटी रुपये खर्च केले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांशी व्हर्च्युअल संवाद साधून महाराष्ट्र, केरळ आणि पश्चिम बंगाल यांसारख्या बिगर भाजप शासित राज्यांमध्ये इंधनाच्या वाढीव किमती असल्याचे सांगत या राज्य सरकारांना सामान्याच्या फायद्यासाठी व्हॅट कमी करण्यास सांगितले त्यानंतर काही तासांनी त्यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

"पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतचा आजचा संवाद पूर्णपणे एकतर्फी आणि दिशाभूल करणारा होता. त्यांनी शेअर केलेले माहिती चुकीचे होती. आम्ही गेल्या तीन वर्षांपासून प्रत्येक लिटर पेट्रोल आणि डिझेलवर 1 रुपये सबसिडी देत ​​आहोत. आम्ही 1,500 कोटी रुपये खर्च केले आहेत.” असे ममता बॅनर्जी यांनी राज्य सचिवालयात पत्रकारांना सांगितले.

या सोबतच या बैठकीत मुख्यमंत्र्यांना बोलण्यास वाव नव्हता असा दावा त्यांनी केला आणि त्यामुळे ते पंतप्रधानांच्या विधानाला विरोध करू शकलो नाहीत असे त्यांनी सांगितले. इंधनाच्या किमती कमी करण्याची मागणी करताना त्या म्हणाल्या की, "कोरोना आढावा बैठकीत पंतप्रधान इंधन दरवाढीवर बोलले नसते तर बरे झाले असते, हा त्यांचा अजेंडा होता,"

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Result: बंगाल निकालाचा 'महासंग्राम'! इतिहास घडणार की परंपरा कायम राहणार? हे ‘गेमचेंजर’ फॅक्टर्स निकाल ठरवणार

Pune : नवले पुलावर चारचाकीने घेतला पेट, पुण्याकडे येणारी वाहतूक तात्पुरती बंद, नेमकी कशी लागली आग?

GT vs PBKS: पहिल्या बॉलवर कॅच सुटला अन् नंतरच्या दोन चेंडूत दोन विकेट्स पडल्या, सिराजच्या ओव्हरमध्ये नेमकं काय घडलं? पाहा Video

Latest Marathi News Live Update : बारामती पोटनिवडणुकीच्या मतदानाचा निकाल सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होणार

Mumbai Pune Missing Link: मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर सेल्फी, रिल्ससाठी वाहन थांबवले तर मोठा दंड; MSRDCचा कडक इशारा

SCROLL FOR NEXT