Narendra-and-Mamta
Narendra-and-Mamta 
देश

‘मतविभाजनासाठी ममतांची मोदीभेट’

पीटीआय

कोलकता - पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणे म्हणजे तृणमूल काँग्रेसच्या विरोधातील मतांचे विभाजन करण्यासाठीचा त्यांचा प्रयत्न होता, अशी टीका प्रदेश भाजपने केली. ममतांनी आजच्या विरोधकांच्या बैठकीला जाणेही टाळले, याकडेही भाजप नेत्यांनी लक्ष वेधले. 

भाजप नेत्यांच्या दाव्यानुसार, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी बोलाविलेल्या बैठकीला न जाता ममतांनी राज्यात शरपंजरी पडलेल्या काँग्रेस आणि माकप पक्षांना हवा देण्याचा प्रयत्न केला आहे. भाजप आणि तृणमूलमध्ये काहीतरी शिजते आहे, अशी लोकांची भावना करून देत तृणमूलविरोधी मते भाजप, माकप आणि काँग्रेसमध्ये विभाजित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र, पश्‍चिम बंगालमधील जनतेने २०२१ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपलाच सत्तेवर आणण्याचा निर्णय घेतला असल्याने ममतांची ही चाल यशस्वी ठरणार नाही, असा दावाही भाजप नेत्यांनी केला.  भाजपची ताकद कमी करण्याचा ममता यांचा डाव असल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT