Dog esakal
देश

मुलाला चावल्याचा बापाने घेतला बदला,क्रूरतेने कुत्र्याचा घेतला जीव

मुलाला कुत्रा चावल्याचा बदला बापाने क्रूरतेने त्या मुक्या प्राण्याचा जीव घेतला.

सकाळ डिजिटल टीम

ग्वालियर : मध्य प्रदेश (Madhya Pradesh) राज्यातील ग्वालियरच्या (Gwalior) डबरात कुत्र्याबरोबर झालेल्या क्रूरतेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओत एक व्यक्ती चाकूने कुत्र्याचे तुकडे करीत असल्याचे दिसत आहे. माहितीनुसार यातील दिसत असलेला व्यक्ती बनावट डाॅक्टर आहे. त्याच्या मुलाला काही दिवसांपूर्वी या कुत्र्याने चावले होते. बनावट डाॅक्टरने कुत्र्याला पकडून अगोदर मारले. नंतर चाकूने वार करुन त्याचे तुकडे-तुकडे केले. व्हिडिओत दिसत आहे, की बनावट डाॅक्टर झुडपात कुत्र्यावर चाकूने वार करित आहे. यात रक्ताने माखलेला कुत्रा पळून जाण्याचा प्रयत्न करित आहे. मात्र तो त्याला पळू देत नाही.

व्हिडिओ साधारण दहा दिवसांपूर्वीचा आहे. जो आता व्हायरल होत आहे. दहा दिवसांपूर्वी बनावट डाॅक्टरच्या मुलाला मोकाट कुत्र्याने चावले होते. त्यानंतर तो त्या कुत्र्याचा शोध घेत होता. घटनेच्या पुढल्या दिवशी त्याला सदरील कुत्रा दिसला. त्याने कुत्र्याला पकडले आणि त्याला मारायला सुरुवात केली. गावकऱ्यांनी बनावट डाॅक्टरच्या क्रूरतेचा व्हिडिओ बनवून व्हायरल केला. आता त्याच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT