UP video 
देश

Video: अंधाराचा फायदा घेऊन त्यानं तरुणीला गाठलं अन्...; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ

UP Kanpur Shocking CCTV: सीसीटीव्हीमध्ये हा व्हिडिओ कैद झाला असून प्रसंग अंगावर काटा आणणारा आहे.

कार्तिक पुजारी

लखनऊ- कानपूरच्या रावतपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका व्यक्तीने अंधाराचा फायदा घेत महिलेचा विनयभंग केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाईन शॉपच्या जवळच हा प्रकार घडला आहे. सीसीटीव्हीमध्ये हा व्हिडिओ कैद झाला असून प्रसंग अंगावर काटा आणणारा आहे.

रिपोर्टनुसार, एक महिला मार्केटमधून भाजी खरेदी करुन घरी परत होती. त्यावेळी एक व्यक्ती तिच्या मागून आला अन् त्याने महिलेचा विनयभंग केला आहे. जेव्हा महिलेने त्याला विरोध केला, तेव्हा त्याने महिलेला जमिनीवर ढकलून दिले. एक व्यक्ती घटनेच्या दिशेने येताना पाहून आरोपीने तेथून पळ काढला. सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. गुन्हेगारांना भीती राहिलेली नाही का? असा प्रश्न विचारला जात आहे.

व्हिडिओमध्ये दिसतंय की, या अनपेक्षित प्रसंगामुळे महिला धक्क्यात जाते. तिला एकदम काय झालं हे सुरुवातीला कळत नाही. ती रडताना दिसत आहे. काही व्यक्तींनी तिची विचारपूस केल्याचं देखील व्हिडिओमध्ये दिसतंय. सदर प्रकार अत्यंत गंभीर असून परिसरात संतापाची लाट आहे.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रदेशाचे डीसीपी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी सीसीटीव्ही व्हिडिओ आपल्या ताब्यात घेतला आहे. रिपोर्टनुसार, याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच आतापर्यंत पाच व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांची चौकशी सुरु आहे. महिलेचा विनयभंग केलेल्या व्यक्तीला पकडण्याची पोलीस सर्व प्रकारचे प्रयत्न करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bullet Train: मुंबई ते अहमदाबाद १ तासात, बुलेट ट्रेन लवकरच सुरु होणार; रेल्वेमंत्र्यांनी तारीखच सांगितली

Pune FDA Action: आंबेगाव ते शिरूरपर्यंत एफडीएचे छापे; दूध भेसळ प्रकरणात १३ जणांवर कारवाई, पुण्यात उडाली खळबळ!

Marathi Live Updates : मोठी दुर्घटना थोडक्यात टळली! वसईत जोरदार वाऱ्याने होर्डिंगचे तुकडे कोसळले

वयाच्या ६० व्या वर्षी आमिर खान अडकला तिसऱ्यांदा लग्नबंधनात, जमीनीवर बसून सह्या केल्या अन्...

Raigad: जीवावर उदार होऊन मुक्या जीवाला जीवनदान!; पुराच्या पाण्यात अडकलेल्या श्वानाची केली सुखरूप सुटका

SCROLL FOR NEXT