man tries to enter parliament with bullets arrested security winter session 
देश

संसदेत आत आणि बाहेरही गोंधळ; जिवंत काडतुसे नेणाऱ्यास पकडले! 

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : दिल्ली दंगलीच्या चर्चेवरून संसदेच्या आतील गोंधळ थांबण्याची काहीही चिन्हे नसताना आज संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास संसद भवनात जिवंत काडतुसांसह शिरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका युवकाला संसद भवन सुरक्षारक्षक व दिल्ली पोलिसांनी पकडले. क्रमांक ८ च्या प्रवेशद्वारातून तो आत जाण्याचा प्रयत्न करत होता. या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान, प्राथमिक चौकशीनंतर त्याला पोलिसांनी रात्री आठच्या दरम्यान सोडून दिल्याचे समजते. 

या ४४ वर्षीय तरुणाचे नाव अख्तर खान असे आहे. त्याच्या तपासणीदरम्यान त्याच्या बॅगमध्ये जिवंत काडतुसे असल्याचे आढळताच सुरक्षा यंत्रांनी मोठा आवाज केला व त्यामुळे संसदीय सुरक्षारक्षकांनी सावध होऊन अख्तर खानला पकडले. चौकशीदरम्यान त्याने सांगितले की आपण काडतुसे बाहेर ठेवण्यास विसरलो होतो, त्याच्याकडे पिस्तुलाचा परवाना आहे. मात्र, हा तरुण संध्याकाळच्या वेळेस संसद परिसरात जाण्याचा प्रयत्न का करत होता, याचे कारण समजलेले नाही. त्याची चौकशी केल्यावर पोलिसांनी त्याला सोडून दिले तरी त्याच्या हालचालींवर नजर ठेवण्यात येईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले. 

देशभरातील बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा

कामकाजातील खोडा कायम! 
संसदेत दिल्ली दंगलीबाबतच्या चर्चेवरून सुरू असलेला गतिरोध कायम असल्याने उद्या (शुक्रवारी) आठवड्याच्या अखेरच्या कामकाजी दिवसातही सभागृह तहकूब करणे अपरिहार्य असल्याचे चित्र स्पष्ट आहे. शिमगा झाल्याशिवाय अजिबात चर्चा नाही, ही सरकारची भूमिका कायम आहे. कोरोनावरील आरोग्यमंत्र्यांच्या निवेदनानंतर काँग्रेससह विरोधकांनी पुन्हा गदारोळ सुरू केल्याने राज्यसभेचे कामकाज दुपारी बारालाच दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. संसदीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी लोकसभेत ११ ला व राज्यसभेत १२ ला चर्चा होईल असे सांगितले. त्यावर गदारोळ सुरू झाला. संतप्त सभापती वेंकय्या नायडू यांनी, ही संसद आहे व बाजार नाही, असे बजावले. काँग्रेसचे सदस्य अमित शहा, मोदी सरकार आदींच्या नावाने ज्या घोषणा देत होते, त्या छापण्यास किंवा दाखविण्यासही नायडू यांनी प्रसारमाध्यमांना मनाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Theft : लॉकरचा पासवर्ड चोरला अन् १७ हजार डॉलर्सवर मारला डल्ला; पुण्यात ऑफिस बॉयचा कारनामा!

Weekend Special Recipe: वीकेंडला घरीच १५ मिनिटांत बनवा हॉटेल स्टाइल 'तंदूर पनीर टिक्का', सगळ्यांचं तोंडात पाणी सुटेल

आजचे राशिभविष्य - 10 जानेवारी 2026

Makar Sankranti 2026: मकर संक्रांतीला काळे कपडे का घातले जातात? कारण ऐकून थक्क व्हाल!

Panchang 10 January 2026: आजच्या दिवशी शनि वज्रपंजर कवच स्तोत्राचे पठण व ‘शं शनैश्चराय नमः’ या मंत्राचा जप करावा

SCROLL FOR NEXT