देश

तिला रेल्वेत रात्री अचानक मासिक पाळी सुरु झाली, अन्...

वृत्तसंस्था

बंगळुरु - बंगळुरुवरून रात्री सव्वा दहा वाजता निघालेली रेल्वे सकाळी 09 वाजून 40 मिनिटांनी बरेलीला पोहचणे अपेक्षित होते. या गाडीने प्रवास करणाऱ्या आर्कीटेक्चरच्या विद्यार्थीनीची मासिक पाळी सुरु झाली. याबद्दल तिचा मित्रा विशाल खानापुरे याने ट्विट करुन रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि रेल्वे मंत्रालयाकडे यासंदर्भात मदत मागितली. त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहीले होते, ‘पियुष गोयल इमर्जन्सी आहे. माझी एक मैत्रिण होपसेट पॅसेंजरने बेंगळुरुवरून बरेलीला प्रवास करत आहे. तिला मासिक पाळीच्या गोळ्या हव्या आहेत. कृपया मदत करावी.’

खरे तर या ट्विटचा काही फायदा होईल की नाही हे विशाललाही ठाऊक नव्हते. मात्र खरोखरच विशालच्या मैत्रिणीला रेल्वे अधिकाऱ्यांनी तिला हव्या असणाऱ्या गोळ्या आणि इतर सामान रात्री दोन वाजता दिल्या जागी आणून दिले. याबद्दल एका इंग्रजी वाहिनीशी बोलताना विशाल म्हणाला की, ट्विटनंतर माझ्या मैत्रिणीला खरोखरच मदत मिळाली. रात्री 11 वाजून 06 मिनिटांनी गाडीमधील एक रेल्वे अधिकारी माझ्या मैत्रिणीकडे आला. तिला कोणकोणत्या गोष्टी हव्या आहेत याबद्दलची माहिती आणि फोन नंबर लिहून घेतला. त्यानंतर रात्री दोन वाजण्याच्या सुमारास अरासीकेरी स्थानकामध्ये गाडी पोहचली तेव्हा मैसूर रेल्वे विभागाचे रेल्वे अधिकारी माझ्या मैत्रिणीला लागणाऱ्या गोळ्या आणि इतर साहित्य घेऊन गाडीमध्ये आले आणि ते साहित्य त्यांनी तिला दिले.

एकूणच भारतीय रेल्वे ऑनलाइन अपडेट होताना दिसत आहे. सुरेश प्रभू यांनी मोदी सरकारच्या कार्यकाळात रेल्वेमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यापासून ट्विटरसारख्या माध्यमातून रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या समस्या सोडवण्यास सुरुवात केली. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाचा कारभार हाती घेणाऱ्या पियुष गोयल यांनीही सोशल नेटवर्किंगवरून रेल्वे संदर्भातील माहिती वेळोवेळी सामान्यांपर्यंत पोहचवण्याबरोबर त्यांच्या समस्यांचे निराकरण एका ट्विटवर किंवा फोन कॉलवर होईल यासंदर्भातील काळजी घेतली. रेल्वे प्रशासनाच्या अशाच एका तत्परतेचा अनुभव रेल्वेने प्रवास करताना अवेळी मासिक पाळी सुरु झालेल्या या माहिला प्रवाशाला आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Solapuri Chaddar : मोदींना गिफ्ट दिलेल्या सोलापुरी चादरीचा इतिहास माहित आहे का ?

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

SCROLL FOR NEXT