N. Biren Singh sakal
देश

N. Biren Singh : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला;मणिपूरमध्ये संशयित दहशतवाद्यांचे कृत्य,एक सुरक्षा कर्मचारी जखमी

मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेनसिंह यांच्या वाहनांच्या ताफ्यावर सोमवारी सकाळी संशयित दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये सुरक्षा दलाचा एक कर्मचारी जखमी झाला.

सकाळ वृत्तसेवा

इंफाळ : मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेनसिंह यांच्या वाहनांच्या ताफ्यावर सोमवारी सकाळी संशयित दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये सुरक्षा दलाचा एक कर्मचारी जखमी झाला. मुख्यमंत्री हिंसाचारग्रस्त जिरीबाम या भागाच्या पाहणीसाठी जात असताना सकाळी साडेदहाच्या सुमारास कोतलेन खेड्याजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक-५३ येथे हा हल्ला झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या दहशतवादी हल्ल्यानंतर परिसरात झडतीसत्र राबविण्यात अाले आणि नाकाबंदी करण्यात आली.

दहशतवाद्यांनी वाहनांच्या ताफ्याच्या दिशेने बेछूट गोळीबार केल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी देखील त्याला सडेतोड प्रत्युत्तर दिले. या गोळीबारामध्ये एका वाहन चालकाच्या उजव्या खांद्याला दुखापत झाल्याने त्याला इंफाळमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ज्या ठिकाणी हा हल्ला झाला ते ठिकाण राजधानी मणिपूरपासून ३६ किलोमीटर अंतरावर आहे. दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी या भागामध्ये सध्या आक्रमक शोध मोहीम राबविली जात आहे.

मुख्यमंत्री एन. बिरेनसिंह हे जिरीबामला भेट देऊन दिल्लीला रवाना होणार होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. जिरीबाममध्ये वांशिक हिंसाचाराचा भडका उडाला असून येथील हिंसाचारामध्ये शनिवारी सत्तर घरांची जाळपोळ करण्यात आली होती.

निर्वासित आश्रयाला

सिल्चर (आसाम) ः मणिपूरच्या हिंसाचारग्रस्त भागातील नागरिकांनी आसामच्या सिल्चर जिल्ह्यामध्ये आश्रय घ्यायला सुरूवात केली असल्याची माहिती स्थानिक आमदाराने दिली. सध्या आंतरराज्य सीमेवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

जिरीबाम जिल्ह्यामध्ये अज्ञातांनी शनिवार दोन पोलिस चौक्या, वनअधिकाऱ्याचे कार्यालय आणि ७० घरांची जाळपोळ केल्यानंतर या भागात पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. आसामच्या कच्छर जिल्ह्यात लखीपूरच्या विविध भागांत सहाशेपेक्षा अधिक निर्वासितांनी आश्रय घेतला आहे. जिरी नदी ओलांडून हे निर्वासित या भागामध्ये येत असल्याचे बोलले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहील मृत्यू प्रकरणात नवा ट्विस्ट! परीक्षेदरम्यान प्राध्यापकांनी बाजूला नेलं अन्..., CCTV फुटेज समोर, 15 मिनिटांत काय घडलं?

Junnar News : शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले.

लहानपणीचं गाणं आजही तोंडपाठ आहे, पण कालचा अभ्यास लक्षात राहत नाही; असं का? जाणून घ्या मेंदूचं रहस्य

Marathi News Live Updates: धाराशिवमध्ये पावसाला सुरुवात

DPL Fixing Controversy: दिल्ली प्रीमियर लीगमध्ये फिक्सिंगचा संशय? वंश बेदीकडे क्रिकेटपटूचा संपर्क; लगेच दिली अँटी करप्शनला माहिती

SCROLL FOR NEXT